पान:मधुमक्षिका.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६८ )

मेघांनीं भरलें; मेघगर्जनेचे कडकडाट चालले; आणि विजा चमकूं लागल्या. तेणेंकरून आसम ह्यास क्षणमात्र देहभान नाहींसें होऊन, अगदीं स्तब्ध झाला. आणि कांहीं पळांनीं पुनः शुद्धीवर येऊन पाहतो तों, आपण त्या सरोवराच्या पाळीवर एक पाय आंत सोडून उभे आहों, असें त्याला दिसलें. आणि जें पाहिलें तें सारें स्वम की काय, असें त्याला वाटून, तो मुकाट्यानें तेथून उठून, पुनः स्वग्रामीं आला. तेथे त्यानें व्यापार धंदा करून पुष्कळ द्रव्य मिळविलें, नवे मित्र जोडले, जुन्यांस ओळखी दिल्या, आणि • खवेंच बेतावादाचा ठेवून राहिलेले आयुष्य सुखांत व सदाचरणांत घालविलें. अशी आसम ह्याची गोष्ट आहे.

श्लोक.

आहे विचित्र करणी परमेश्वराची;
 तेथें मनुष्यमति कुंठित होय साची;
त्याने दिले नियम घालुनि जे सुभावें;
ते मानवीं सकल मानित नित्य जावें. ॥ १ ॥


कोळी.

 प्राण्यांच्या स्थितीकडे ज्या विचारी विद्वानांचें विशेष अवलोकन आहे, ते असें सांगतात कीं, प्राणी ज्या मानानें आपण होऊन कळप करून एकत्र राहतात त्या मानानें त्यांची बुद्धि कम जास्त असते. हा नियम प्रायः खरा आहे. हत्ती हा त्याच्या मूळच्या वन्य स्थितींत ज्यांनीं पाहिला आहे, त्यांस त्याच्या शाहा-