पान:मधुमक्षिका.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६७ )

गुण वाटत नाहीं, कां कधीं कोणी कोणाच्या उपका- राची गरज ठेवीत नाहीं. असो. तरी त्यांस स्वदेशा-' भिमान फार असेल, असें मला वाटतें. देवदूत ह्मणतो, " ऐक; आसमा, असा मुलूं नको; भरे, ज्या आपल पो- टया मनोवृत्तीनें, लोकांच्यापेक्षां स्वतःचें हित अधिक करावें असें वाटतें, तिजपासून स्वदेशाभिमान उत्पन होतो. पहा कीं, सर्वांभूतींसारखी दया करणे, हा गुण मात्र अगदीं निर्दोष आहे, आणि तोच ह्या लोकांत पूर्ण- पणें वसत आहे. मग त्यांस परदेशांपेक्षां स्वदेशाचें हित जास्त व्हावें, असा पक्षपाताचा विचार कसा स्प- शैल. ?" हे ऐकून आसम अगदीं निराश होऊन ' उष्ण श्वास टाकून ह्मणतो, " काय दुर्दैव हें. ! मी ह्या असल्या जगांत राहून काय करूं ? येथील लोक निर्वाहतृप्त आहेत, हाच काय तो ह्यांचा सद्गुण; तो क्षुद्र प्राण्यांच्याठायींही असतो. धैर्य, औदार्य, स्नेह, ज्ञान, संभाषण, देशाभिमान, ह्या गोष्टी ह्यांच्या स्वमीं- ही नाहींत. ह्यावरून असें दिसतें कीं, सद्गुण को - णता, हें न समजणें, हाच मोठा दुर्गुण आहे; अथवा, जो सद्गुण कोणते ते जाणील, तोच दुर्गुण कोणते हैं जाणील. आतां, हे देवदूतां, ज्या जगाचा मी इतका द्वेष करीत होतों, त्या पूर्वीच्या माझ्या जगांत मला परत ने. मी आपल्या हाताने आपणास त्रास आणला, ह्मणून मी ही विपत्ति भोगितों. मी परमेश्वराच्या करणीस नांव ठेविलें हें महत्पाप केलें. मी अज्ञान आहें. मला पूर्वीच्या माझ्या जगांत पोंचीव. मी तुझ्या पायां पडतों." असें तो बोलतो आहे वों दिशा धुंद झाल्या; आकाश
.