पान:मधुमक्षिका.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६६ )

असतील, असे मला वाटतें. कांकीं ते केवळ निर्वाहा: पुरत्या थोडक्या वस्तूंनीं तृप्त होतात, आणि तृप्ति हेंच सुखाचें स्थान, असें ह्यटलें आहे. आणि त्यांस सुखा- ची फार हांव नसल्यामुळे त्यांचे हातून परोपकार बहुत होत असतील, नाहीं बरें ? " हें तो बोलतो आहे, इतक्यांत गरीब, अनाथ, क्षुधेनें पीडित, अशा एका मनुष्याची दीनवाणी त्याचे कांनी पडली. तेव्हां तो लागलाच त्याच्या समाचारास त्यापाशीं गेला. आणि पाहतो तों, भुकेनें त्याचा अगदीं आंकडा वळून गेला आहे. त्यास पाहून आसम ह्मणतो, “ अहो, दुर्गुण- राहत मनुष्यांस दुःख व्हावें, आणि अशा सद्गुणी ह्मणविणाऱ्या लोकांनीं त्यांस पाहूं देखील नये, हा मोठा चमत्कार नव्हे काय.”? हें ऐकून तो दुःखित मनुष्यच तो, “ येथे ज्या त्या पाशीं फक्त त्याच्या पुरतें मात्र भन्न आहे. आणि तेवढ्यांत तो तृप्त आहे; तर त्यानें आपले तोंडचा घांस काढून मला देणें आणि आपला जीब मारणें, हा तरी अन्याय नव्हे काय ?" आसम ह्मणतो, “ · त्यांनीं आपल्या निर्वाहाहून पुष्कळ जास्त कां मिळवून ठेवूं नये.”? असें बोलून गेल्यावर स्मरल्या- सारखें करून मान हालवून ह्मणतो, “हो, हो; मी विस- रलों; असें जास्त मिळवून ठेवणें' हाच हांवरेपणा, हाच अधाशीपणा; बोललों त्यांत मींच आपले खंडण केलेसें झालें. मीच मनुष्यास अधाशीपणावरून अत्यंत नीच मानीत नसें काय. ? मी पूर्वी ह्मणत होतों काय, आणि आतां ह्मण- तों काय सगळा घोटाळा आहे. कांहींच समजत कृतघ्नता नाहीं.नसणें हा देखील येथें कोणाला सद्-