पान:मधुमक्षिका.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६५ )

लोकांशी कसे वागावें?, स्वहित कसें साधावें ? आणि जनाच्या दुष्टत्वापासून आपला बचाव कसा करावा ? हेंच कायतें ज्ञानना.? त्याची तर येथें बिलकूल आवश्य- कता नाहीं. कां कीं, येथचे सर्व लोक स्वभावतः सन्मार्गवर्ती आहेत. ते आपली कर्तव्ये कधीही चुकत नाहींत. निर्वाहाहून जास्त सुखाकरितां अथवा कर्मणु- कीकरितां जें पोकळ ज्ञान तुझ्या पूर्वीच्या जगांत फार - वाढले आहे, त्याची हे लोक गरज ठेवीत नाहींत. " आसम ह्मणतो, “एकूण येथचे लोक एकलकोंडये, आहे- त; ते एकमेकांकडे जातयेत, बोलत चालत नाहींत, असें वाटतें.” देवदूत ह्मणतो, " होय, तूं ह्मणतोस तें खैर आहे. एकमेकांकडे जाणें येणें, मंडळींत मिळून राहणें, स्नेह जोडणें, हें सर्व, एकाद्या भयापासून किंवा संकटापासून आपले रक्षण होण्यास आपणास साह्य मिळावें, ह्मणूनच मुख्यत्वें करायाचें कीं नाहीं ? तर येथें सर्वच सत्यमार्गी असल्यामुळे भयाचा व संकटाचा संभव नाहीं. तेव्हां दळणवळणाचें व स्नेहाचें प्रयोजन काय ?" आसम ह्मणतो, “बरें तर, मला, येथें आपलें एवढे आयु- ष्य घालवायाचें आहे, त्यापक्षों कला कौशल्य, मंडळी व इतर ज्ञान कांहीं नसले, तरी एक मित्र तर निदान बोलाचालायास पाहिजे कीं नाहीं. ?" देवदूत ह्मणतो, “ पण तो तरी कशाला पाहिजे. ? येथें स्तुति करणें व ऐक- दोनही वर्ज्य आहेत; आणि ज्या गोष्टीवांचून • अडत नाहीं, तिचा स्वीकार करणें, हें महत्पाप आहे, असें लोक समजतात." हें ऐकून आसम ह्मणतो, " तर, आमच्या जगांतल्यापेक्षां येथचे लोक फार सुखी