पान:मधुमक्षिका.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६४ )

व्यर्थ आहे. जर जगामध्ये आपणास सुखानें राहाय- याचें आहे, तर आपणांहून नीच जातींच्या प्राण्यांवर अन्यायानें जुलूम केल्याचे पातक आपलेमाथां घेतल्यावां- चून गत्यंतर नाहीं, अशी माझी आतां खातरी झाली. " देवदूत उत्तर करितो, " इतर प्राणी आणि मनुष्ये ह्यांचा हा संबंध असो; पण, आतां आपण मनुष्यांमध्येंच कांहीं चमत्कार पाहूं "
 पुढें चालतांचालतां आसम देवपुरुषास ह्मणतो, “हे लोक असे अज्ञान व रानटी स्थितींत कां बरें राहतात. ? ते भापणांत सुधारणा कां बरें करीत नाहींत. ?” त्यानें उत्तर केलें, “तुला ह्या गोष्टीचें नवल वाटावयास नको.' हे लोक ह्याच आपल्या पूर्वस्थितीत तृप्त आहेत. प्रत्ये- कास त्याच्या कुटुंबापुरतें एक एक झोपडे आहे, तेंच त्याला पसंत वाटतें; मोठमोठे सुंदर बंगले उठविल्यास आपण गर्विष्ठ होऊं, व लोक आपला मत्सर करितील, `च्या अर्थी ते नकोतच, असें ते समजतात; जें जें कांहीं कधीं ते करितात, तें डौलासाठीं अथवा ऐष आरामासाठीं करीत नाहीत; तर त्यांचा सगळा रोख निर्वाहाकडे असतो.” आसम ह्मणतो, “तर मग त्यांच्यामध्यें लोहार, सुतार, रंगारी, गोंडी, पाथरवट, इत्यादि कारागीर मुळींच नसतील. असो, चिंता नाहीं. पण तुझीं मला अशा ब्रह्मज्ञानी मनुष्यांच्या पवित्र जगांत आणिलें, • ह्मणून मी तुमचे फारफार उपकार मानितों. आणि तुझांला मी खचीत सांगतों कीं, ज्ञानासारखी दुसरी कोणतीही गोष्ट मला प्रिय नाहीं." देवदूत ह्मणतो, “काय ? ज्ञान. ? अंः, त्याची येथें काय गरज आहे.? आपण