पान:मधुमक्षिका.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६३ )

आहेत, आणि तो धूम पुढे पळत चालला आहे, असें त्यांनीं पाहिलें. तेव्हां, आसम आश्चर्य भरित होत्साता देवदूतास ह्मणतो, "अहो, हा पुरुष, ह्या यःकश्चित् प्रा- ण्यांस भिऊन कां पळतो बरें ?” ! इतक्यांत, दुसरा एक मनुष्य कुत्रा मार्गे लागल्यामुळे पुढे पळतांना त्यांच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून तर आसमची अक्कल अगदीं गुंग होऊन गेली. आणि तो त्या देवदूताकडे वळून पुनः म्हणाला, “अहो महाराज, हें आहे तरी "काय, तें मला सांगा." त्यानें उत्तर दिलें, “अरे आ- समा, ह्यांत कांहीं मोठा चमत्कार नाहीं. येथील लोक ते असें ह्मणतात तुजसारखेच मोठे दयाभूत आहेत. कों, ह्या क्षुद्र प्राण्यांचा इच्छाभंग करून त्यांस त्रास देऊ नये; त्यांस यथेच्छ वागूं द्यावें; त्यांस यत्किचित दुखविणें हें महत्वात आहे; तेणें करून हे प्राणी पराका- ष्टेचे प्रबल व असंख्यात झाले आहेत; ते ह्या प्रमाणेंच मनुष्यांस सर्वदा त्रास देत असतात. " आसम झणतो, "नाहीं नाहीं, त्यांना इतकें प्रबल होऊं देतां कामा नये; त्यांस मारून टाकिलें पाहिजे; नाहीं तर तुझीच पाहा, त्यांच्या पासून काय परिणाम होतात ते.” तें ऐकून जरासे हंसून देवदूत ह्मणतो, "कां, महाराज आसमराय, क्षुद्र प्राण्यांविषयीं जी आपणाला एवढी मोठी कींव वा- टत होती, तो आतां कोणीकडे गेली ? ती न्यायबुद्धि इतक्यांतल्या इतक्यांत आपण विसरलां काय ? प्राण्यांस दुःख देणें हा मोठा अन्याय आहेना ?" आसम, शुद्धीवर आल्यासारखें करून मान हालवून ह्मणतो, "नाहीं, नाहीं, नाहीं, गुरो, मी चुकलों; जें मी मघाशीं बोललों तें सर्व