पान:मधुमक्षिका.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६२ )

तीन तीन हात उंच झोपड्या गवतपाल्याच्या बांधिले. ल्या; शेतें नाहींत ; मळे नाहींत ; बागा नाहीत; बाजार नाही; लोकांचे एकमेकांशी फारसें दळणवळण नाहीं. त्यांस पुरती भाषा आहे कीं नाहीं, ह्याचा संशय; त्यां- च्या आंगांवर वस्त्रे नाहीत; असें त्याच्या दृष्टीस पडलें. व हिंस्र पशु इकडे तिकडे हिंडतांना व गुरकतांना त्यांनी पाहिले. तेव्हां आसम बोलतो, "माझें पूर्वीचें जग आणि हें जग ह्यांच्या मध्ये मला इतकाच फरक दिसतो कीं, तें पुष्कळ सुधारून उत्तमावस्था पावलें आहे; आणि हें अगदी आपल्या बाल्यावस्थेत ह्मणजे, रानटी व अज्ञान दशेत आहे. तेथच्या प्रमाणे बलवा- न प्राणी दुर्बल प्राण्यांवर येथेंही जुलूम व अन्याय करि- तात ना.? अरेरे! काय करावें ? जर परमेश्वर माझ्या • सांगण्याप्रमाणे वागणारा असता, तर असे दुसन्यास त्रास देणारे प्राणी मी ह्या जगांतून समूळ काढून टाक- विले असते. ! ह्या दुःखभागी दुर्बल प्राण्यांची मला फार कींव येते. पण उपयोग काय! कोणी कोणाला त्रास न देतां सर्व सबल दुर्बल प्राणी ह्या जगांत स्वस्थ राहतील, तर ती किती आनंदाची गोष्ट होईल!" ह्यावर, तो देवपुरुष उत्तर करितो, "आसमा, तूं मोठा दयाळू आहेस. परंतु पहा; सर्व प्राण्यांचें उपजीवन चालण्यास नुसत्या वनस्पति पुरणार नाहीत; ह्मणून कितीएकांनी आपला निर्वाह इतर प्राण्यांवर करावा, असा ईश्वरी संकल्प आहे. हा जर नसता, तर कितीएक प्राणी अन्न अन्न करून मेले असते. असो, चला आपण पुढे जाऊं.” ते दोघे कांहींसे पुढें • गेले, तों, दोन तीन मांजरे एका माणसाच्या मागे लागली