पान:मधुमक्षिका.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६१ )

लीं जाऊं लागला.त्याप्रमाणें आसमही जाऊं लागला. असें पुष्कळ खोल गेल्यावर त्यांना एक नवीच सृष्टि लागली. ती पाहून आसमास पराकाष्ठेचें नवल झालें. ती सृष्टि रचनेनें, हुबेहुब ह्या सृष्टीसारखी होती.
 आसम परम आश्चर्यभरित झाला आहे असें पाहून तो देवदूत ह्मणतो, “ अरे मित्रा, एका भक्ताला तुजप्र- माणेंच मानवस्वभावाविषयीं संशय प्राप्त झाला होता, तो नाहींसा करण्यासाठीं जगदीश्वरानें हें जग निर्माण केले. ह्यांतील मनुष्यें तुझे इच्छेप्रमाणें दुर्गुणरहित केली आहेत; हें जग बाकीच्या इतर सर्व गोष्टींनीं तुझ्या पहिल्या जगाप्रमाणेंच आहे; परंतु, ह्यांतील मनुष्यें क धीं पाप करीत नाहींत, एवढेच काय तें ह्यांत विशेष आहे. हें जर तुला पसंत वाटलें, तर खुशाल येथें रा- हा. पण ह्याची पूर्ण माहिती तुला होई तो पर्यंत जे जे संशय तुला येतील, ते ते फेडण्यासाठीं मी तुझ्या ब- रोबरच असतो. "
 आसम ह्मणतो, “भगा साधी, हें जग दुर्गुणरहित आना. !! अहाहा परमेश्वराची मजवर केवढी कृपा ही ! त्याने माझ्या इच्छेप्रमाणे मला राहायास स्थान दिलें ! फा- र उत्तम गोष्ट आहे. हे परमेश्वरा, तूं धन्य आहेस.!" हैं ऐकून घेऊन देवदूत ह्मणतो, “आधीं जरा दम धर आपले सभोवती पाहा आणि त्याविषयीं तुला जें कांहीं विचारायाचें असेल, तें मला विचार." असें भाषण होतां होतां ते गांवांत गेले. तेथें पाहातात तों, वाटा अगदीं अरुंद, त्यांतही गवत वाढले आहे; घरें ह्नदलीं, तर