पान:मधुमक्षिका.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६० )

तींत मी हतभाग्य कशाला जन्मलो.जर माणसाच्या आंगांत एवढे दुर्गुण नसते, तर ही सृष्टि एकसारखी निष्कलंक राहिली असती. माझ्या न्यायी परमेश्वराच्या हातचें जग त्याप्रमाणें निर्दोष असावें, हेंच त्याला भू. षण आहे. हे सर्वसाक्षिन् दयालो विश्वपते, मला दीनाला अशा या अज्ञानांधकारांत, संशयांत, आणि निराशेत कां गचंगळ्या खायास लाविलें आहे ? मजकडे कृपादृष्टीने पहा." असें ह्मणत आसम खाली सरोवरावर आला.- आणि " हा जीव राखून ठेवून तरी काय करावयाचें आहे." असें मनांत आणून तो जलसमाध घेण्याच्या निश्चयानें तयारी करून पुढे सरसावला. आ- णि आतां तो उडी घालणार, इतक्यांत, गंभीरमुद्रेचा ए- क वृद्ध मनुष्य पाण्याच्या पृष्ठभागावरून चालत आप- णाकडे येत आहे, असें त्यानें पाहिलें. तेव्हां त्याला इतका चमत्कार वाटला की, उडी टाकण्याचें भान मु- ळींच राहिलें नाहीं; आणि हा कोणी देवपुरुष आपणास दर्शन देण्यासाठी येत आहे, असें त्याला वाटलें.

 तो पुरुष आसमाजवळ येऊन त्यास ह्मणाला, "अरे पुरुषा, जरा दम धर; असा अविचार करूं नको. सर्व- द्रष्ट्या विश्वपालकानें तुझें सदाचरण, प्रमाणिकपणा, आणि दुःख हीं पाहून, तुझें सांत्वन करण्याकरितां मला तुजकडे पाठविलें आहे. हा माझा हात धर; आणि जि- कडे मी जाईन, तिकडे तूं माझे मागून ये. भिऊं नको.मी तुझ्या सर्व संशयांची निवृत्ति करितों. "
 हे ऐकून आसम त्याचे मागून चालला.. सरोवरा- च्या मध्यभागी जाऊन तो देवदूत पाण्याच्या खालीं खा