पान:मधुमक्षिका.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५९ )

लेला वेळ विचारांत, व दुष्ट, कृतघ्न जनांच्या साह्यावांचू- न आपणास आपला जीव जगवितां आला, ह्या गोष्टीच्या अनंदांत घालवावा, असा क्रम त्याने चालविला.त्या शिखराच्या पायथ्यास एक मोठें सरोवर होतें. त्यांत वरच्या सर्व प्रदेशाचें प्रतिबिंब पडून, तें मोठ्या मजेचें दिसे. तें पाहण्याकरितां तो केव्हां केव्हां तेथें जाई. वरून खालीं उतरतांना, सृष्टिसौंदर्य पाहून जो आनंद त्याला होई, त्याचें वर्णनहीं करतां येत नाहीं. त्या आनंदभरांत तो आपले मनाशींच वारंवार ह्मणे कीं, अहा हा ! परमेश्वराची करणी किती रमणीय आहे !! हैं केवळ अरण्य आहे, तरी किती सुंदर दिसत आहे ! ह्याचा उपयोग पाहूं लागलों तर हें सौंदर्य त्याच्या पुढें कांहींच नाहींसें होतें. ह्यांत शेंकडों नद्या उत्पन्न होऊन खालीं वाहत जातात; त्यांच्या योगानें अनेक देशांत पीक होऊन तेथील लोक सुख पावतात. हें अरण्य कोट - वधि प्राण्यांस अन्न व आश्रय पुरवितें हें अरण्य भ नंत वनस्पतींनीं भरलें आहे; त्यांच्या योगानें प्राण्यांचे रोग दूर होतात. सारांश परमेश्वराची करणी भगा- ध आहे. हे सगळे चागलें आहे, परंतु, ह्या सृष्टींत दुष्ट, अधाशी, कृतघ्न, व अधम असा एक प्राणी आहे; तो कोणता ह्मणाल तर मनुष्य. जितके दुर्गुण, तितके ह्याचे ठायीं भरले आहेत. महापूर, विद्युल्लता, धरणी- कंप, चंडवात, ज्वालामुखी, ह्यांचाही एकवेळ ह्या ज गास चांगला उपयोग घडतो, परंतु मनुष्याचा कांहीं उपयोग नाहीं. जिच्या दुष्ट कृत्यांपासून न्यायी परमे- श्वराच्या करणीस बट्टा लागतो, अशी जी मानवजाति,