पान:मधुमक्षिका.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६ )


ती मिळविली आणि न मिळविली सारखीच.एकादा मनुष्य चांगला वैद्यक पढलेला असतो; त्याला रोगांची लक्षणें, व निदानें मुखोद्गत असतात; व जवळ रसायनें सिद्ध असतात; तरीं त्याच्यानें रोगी वरा होत नाहीं. हें सर्वांस ठाऊक आहे. ह्यावरून विद्येपासून होणारा लाभ केवळ पुस्तकज्ञानानें प्राप्त होत नाहीं, हें स्पष्ट आहे.
 दुसन्यास कुंठित करण्यासाठी, अथवा घोटाळ्यांत पाडण्यासाठी, अथवा बोलायाला काहीतरी विषय असावा एवढ्यासाठींच वाचूं नये. पुस्तकांत जें आढळलें, तें निर्विवाद खरें आहे, असे मानूं नये.ज्या गोष्टी अव लोकनांत येतात, त्यांची सत्यता, कार्यकारणभाव, परिणाम, आणि त्यांपासून ग्राह्य ताप्तर्य कोणते निघतें, ह्यांविषयीं विचार करावा. सगळी पुस्तकें एकाच यो- ग्यतेचीं असतात असें नाहीं. कितीएक कारणपरत्वें पा. दायाची असतात; ह्यांत कोशांदिकांचा समावेश होतो. कितीएक साद्यंत वाचण्याजोगों असतात, पण ती अग दी पूर्ण लक्ष देऊन वाचिलीं पाहिजेत अशीं नसतात मनोरंजक गोष्टी, नाटकें, हीं या वर्गांतलीं होत. आणि कितीएक अशीं असतात कीं, तो मुळापासून शेवटापर्यंत एकाग्र चित्तानें वाचून, त्यांतील विषय पूर्णपणें मनांत बिंबवून घेऊन, त्यांवर पुष्कळ विचार व शोध करून, त्यांतील मतलब ह्मटल्यावेळेस आठवे असा त्यांचा अभ्यास करावा लागतो; न्यायशास्त्र, प दार्थविज्ञान शास्त्र, इत्यादिकांचा हा वर्ग जाणावा. ज्या भाषेत जे ग्रंथ आरंभी निर्माण होतात, तींत ते वाचिले