पान:मधुमक्षिका.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५८ )

होते ते भवमानूं लागले; आणि जे स्नेही ह्मणवीत असत,ते अगदीं . परके किंवा शत्रु, असे अनुभवास आले. कोणी साह्य करीना, हें पाहून त्याला अत्यंत खेद व पश्चात्ताप झाला.एके वेळीं तो एकांत बसून आपणाशींच ह्मणतो. -

आर्या.

त्यांत पळहि न वसावें, ज्यांत दुरितभीति धर्म नय नाहीं. तृणचर मुखें सुखें अवलोकांवीं खळमुखे न नयनांहीं.

मोरोपंत.

 अशी साधुवाणी आहे, ती खरी आहे.आतां ह्या दुष्ट, पातकी, कृतघ्न जनांत आपण राहूं नये.अरण्या- ची वाट धरावी. आणि ज्या स्थली ह्या अधम प्राण्यां• चें (मनुष्यांचें ) वारे नसेल, त्या निर्बंध स्थलों जाऊन राहून, आपले आयुष्याचे बाकी राहिलेले दिवस घालवावे.
 असा विचार करून, तारिस नामक पर्वताच्या गगन- चुंबित शिखरावर किर्र झाडी होती, तींतून सिंहव्याघ्रादि हिंस्र पशूंचे भयंकर शब्द ऐकूं येत, घों घों बारां वाह- तअसे, धो धो धबधबे पडत असतं, खळ खळ नद्यांचे प्रवाह वाजत होते, अशा भयानक एकांत स्थलों स्वजाति- बंधुद्वेष्टा आसम गेला. - तेथें एक लहानशी गुहा होती, तींत तो राहिला. तेर्णेकरून वारा, पाऊस ह्यांपासून त्याचा बचाव होत असे. दिवसा बाहेर जाऊन मोठ्या कष्टानें कंदमूलें आणावीं; आणि पाणोथा पाहून तेथें तीं भक्षून पाणी प्यावें, प्राणरक्षणार्थ इतर अवश्य ज्या गोष्टी त्या कराव्या, विश्रांतीसाठीं निजावें, आणि बाकी राहि-