पान:मधुमक्षिका.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५७ )

१५०४१९६ रुपये आहे.—राजधानीचे शहर कोलापूर. राजा मराठा आहे.
जाहागीरदार.-वर सांगितलेल्या संस्थानांखेरीज जे मोठमोठे प्रसिद्ध जाहागीरदार आहेत, त्यांचीं नांवें येणेंप्रमाणे:-

अकलकोटकर .

पंतप्रतिनिधी.

पंतसचीव.
निंबाळकर.
डफळे.

शेखमिरा.

जमखंडीकर.

कुरुंदवाडकर.

मिरजकर.

मुधोळकर.

सांगलीकर.



आसम.


हा पुरुष प्रथमतः मोठा संपत्तिवान् होता. तो सर्व मनुष्यांशी प्रीतीनें व नम्रपणानें वागत असे. क्षुधितांस पोटाला घालावें, उघड्यांस वस्त्र द्यावें, दुःखित जनांची पीडा निवारावी, अशा सत्कर्मी त्यानें आपलें बहुतेक आयुष्य व सगळें वित्त घालविलें. जेव्हां तो हीं धर्म-करी, तेव्हां मनांत ह्मणत असे कीं, आज मी ह्यांस साह्य करितों, तसें, प्रसंग पडल्यास, मलाही जन साह्य करतील. परंतु, जगदीशसंकेतानुरूप त्याला काल प्रतिकूल झाला, तेव्हां जग कसें आहे, हें त्याला सम- जलें. त्याजकडे कोणी ढुंकून देखील पाहीना.भर- भरीच्या वेळीं जे स्तुति करीत होते, ते निंदूं लागले; जे भीत होते ते चेष्टा करूं लागले; जे प्रामाणिक से वाटले होते, ते लबाडसे प्रत्ययास आले; जे मानीत

१४