पान:मधुमक्षिका.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५६ )

ह्याचें क्षेत्रफळ ४३९९ चौरस मैल आहे. लोक- संख्या ३२५५२६ आहे. आणि वसूल ६६८७४४० रुपये आहे. ह्यास इंग्रजांचा आश्रय आहे. व त्यां- ची फौज त्याचें चाकरीस आहे. ह्या राज्यांतून नर्मदा, साबरमती, मही, वनास, इत्यादि नद्या वाहतात. - राजधा- नीचें शहर बडोदें. प्रजा हिंदू, मुसलमान, पारसी, ह्या जातींची आहे—कबीरवड ह्मणून नर्मदेच्या कांठीं एक फार मोठा वडाचा वृक्ष आहे. तो दुरून लहानशा डोंगराएवढा दिसतो; व त्यानें सात बिघे जमीन झांकि ली आहे.त्याच्या पारंब्या इतक्या दाट आहेत कीं, नदीला महापूर आला असतां गांवांतील लोक त्यांच्या आश्रयास जाऊन राहतात.
 सांवतवाडी. - हें संस्थान दक्षिणेंत कोंकणामध्ये आहे. ह्याची लांबी ५० मैल रुंदी ३० मैल आणि क्षेत्रफळ ८०० चौरस मैल आहे. ह्यांत खांचीखळगे, डोंगर, रानें फार आहेत. मुख्य पीक तांदुळांचें आहे. नारळ पुष्कळ बाहेर जातात. नक्षीचें, रंगीत, लांकडी वगैरे काम फार चांगलें होतें. गंजिफांची तर फारच प्रसि शार्द्ध आहे. लोकसंख्या १२०००० आहे. ती प्रजा बहुतेक मराठी आहे.—तेथील अधिकारी सरदेसाई आहे. त. त्यांचें आडनांव सावंत असें आहे. हल्लीं संस्था- नाची वहिवाट इंग्रजांकडे आहे.
 कोलापूरचें राज्य. - हें मुंबई इलाख्यांत आहे. ह्याची लांबी ९५ मैल, रुंदी ६५ मैल, व क्षेत्रफळ ३४४५ चौरस मैल आहे. ह्यांतून कृष्णा व वारणा ह्या नद्या वाहतात. लोकसंख्या ५००००० आहे.- वसूल सुमारें