पान:मधुमक्षिका.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५५ )

डी आहे. ह्याची लांबी २४६ मैल रुंदी १७० मै. ल, व क्षेत्रफळ २३११९ चौरस मैल आहे. - तापी व चंबळा ह्या ह्यांतून वाहतात.. तांदूळ, गहूं, ज्वारी, बा- जरी, मका, ह्रीं धान्यें, व, तमाखु, आणि कापूस, ह्यांची लागवड होते. अफूसाठीं खसखस लावितात. मुख्य व्यापार अफूचा . प्रजा मुसलमान व हिंदू. तेथील हिं- दूंमध्यें मराठे, बुंदेले, रजपूत, जाट, असे भेद आहेत. राजधानीची जागा ग्वाल्हेर शहर.शिवाय उज्जनी ब-हाणपूर, चंदेरी,इत्यादि शहरे आहेत.
 राज्याचा मूळ स्थापक राणोजी शिंदा. तो बाळा- जी विश्वनाथ पेशव्याच्या पदरीं मोठा सरदार होता. त्याचाच वंशज हल्ली गादीवर आहे. - ह्याला इंग्रजांचा आश्रय आहे. त्यांचा रेसिदेव त्याचे दरबारी अस- तो. ह्या शिवाय संरक्षणार्थं इंग्रजांकडची फौज आहे. तिचा खर्च शिंदे सरकार देतें.
 होळकराचें राज्य. - ह्याचा मुलख सलग नाहीं; कां • हैं। द्दिकडे कांहीं तिकडे असा तुटून आहे. सगळें क्षे- त्रफळ ८३१८ चौरस मैल आहे. गहूं, ऊस, खस- खस, तमाखू, कापूस वगैरे ह्या मुलखांत पिकतात. प्र- जा हिंदू, मुसलमान, गोंड, भिल्ल, ह्या जातींची आहे. गादीची जागा इंदूर शहर. ह्याखेरीज मंडळेश्वर, रामपूर, भानपूर, वगैरे प्रसिद्ध गांव आहेत. मूळरा- ज्य स्थापणारा मल्हारराव होळकर. त्याचा वंशज ह ली गादीवर आहे. ह्या राजास इंग्रजांचा आश्रय आ हे. त्यांचा रसिदेत त्याचे दरबारी असतो.
 गायकवाडाचें राज्य.—ह्याचाही मुलूख सलग नाहीं.