पान:मधुमक्षिका.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५४ )
हिंदुस्थानांतील कांहीं संस्थानांचे वर्णन.

 निजामाचें राज्य. - हें दक्षिण प्रांतामध्यें आहे.ह्या- च्या चोहीं बाजूंस ब्रितिश सरकाराचें राज्य आहे; ह्याची लांबी ४७५ मैल; व रुंदी सुमारें तितकीच आहे व क्षेत्रफळ ९५३०३७ चौरस मैल आहे. ह्यांत मो- ठे सुभे चार आहेत. १ हैदराबाद २ औरंगाबाद; ३ बेदर; आणि ५ वऱ्हाड ह्यांपैकीं वऱ्हाड प्रांत नि- जाम सरकाराने फौजेच्या खर्चाबद्दल आलीकडे इंग्लि- शांस दिला आहे. ह्या राज्यांतून गोदावरी, वर्धा, कृ- ष्णा, तुंगभद्रा, इत्यादि नद्या वाहतात. - तांदूळ, गहूं, ज्वारी, बाजरी, वगैरे धान्यै होतात. - कापूस, नीळ, ऊंस हे व्यापाराचे पदार्थ होतात. - मुसलमान, मराठे, तैलंग,' व गौड, ह्या जातींची प्रजा आहे. - राजधानीचे शहर हैदराबाद. ह्याशिवाय, शिकंदराबाद, औरंगाबाद, जाफराबाद, जालनें, गोंवळकोंडें वगैरे शहरे आहेत. - गोवळकोंड्याचे किल्ल्यांत निजामाचा खजीना असतो. गोवळकोंड्याचे हिरे फार प्रसिद्ध आहेत. - राज्याचा बसूल १५५००००० रुपये आहे. राजाचा किताब निजाम उल्मुलूक असा आहे. पहिला निजाम औरं- गाबादेचा सरदार होता. त्याचाच वंशज हल्लीं गादी- वर आहे. तो आपले राज्यांत पाहिजे तें करण्यास मुखत्यार आहे. तथापि त्याचा व इंग्लिशांचा तह ठर लेला आहे, त्याप्रमाणे तो त्यांच्या आश्रयानें असतो.. त्याच्या राजधानीजवळ इंग्लिशांच्या रेसिदेंताचें ठाणें असतें, व त्याजपाशीं कांहीं फौजही असते.
 शिंद्याचे राज्य. - ह्याची आकृति अगदीं वांक-