पान:मधुमक्षिका.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५३ )

कालचक्रासमवेत मानवस्थितिचक्र फिरत नसतें, तर सुखावह होता. परंतु, तसे नसल्यामुळे त्यापासून फार हानि होते. जुन्या रीति टाकून नव्या घेतल्यामुळे, कधीं कधीं इतका त्रास होतो कीं, तो सांगतां पुरवत नाहीं. ह्याचा अनुभव सांप्रतकालीं हिंदू लोक आणि पारसी लोक इंग्लिश लोकांच्या राज्यांत राह- तात, त्यांच्या रीतींच्या फेरफारावरून सहज लक्षांत येईल.
 नवीन रीति प्रचारांत आणणारांनी कालचक्रांचा कित्ता घेतला पाहिजे. ह्मणजे तें जसें कोणाच्या दृष्टो- त्पत्तीस अथवा अनुभवास न येतां सर्वदा तिळतीळ हळूहळू फिरत असतें, तद्वत् नवीन रीतीचा प्रवेश जनांमध्ये हळूहळू झाला पाहिजे. ह्मणजे तीस कोणीहरकत करीत नाहीं. ह्याचें कारण असें कीं, तो अल्पांश जरी लोकांला दोषसा वाटला, तरी अल्प 'ह्मणूनच त्यांचें त्याजकडे दुर्लक्ष्य होतें. आणि तो अल्पांश वृद्धि पावतांपावतां, शेवटीं ती सर्व रीत लोकांत शिरते, व सहवासेंकरून त्यांस पसंतही पडते. परंतु, रीति चांगली आहे, अशी पक्की खातरी झा- • ल्पावर तिचा लोकांत प्रवेश होण्याविषयों प्रयत्न करावा. नाहींतर हित न होतां उलटें अहित होईल. लोक- रीति बदलणें, हेंच सुधारण्याचे साधन, असें धरून चा- लूं नये; तर सुधारण्यास कोणकोणत्या रीति बदलल्या पाहिजेत, व नव्या घेतल्या पाहिजेत, ह्याचा आधीं पुर- ता विचार करावा.