पान:मधुमक्षिका.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५२ )

वाचकांनींच पाहावें. बरें, जर अशा दुष्ट गोष्टी जनां- त वाढत आहेत, तर, नवे जुने न पाहातां, जे योग्य उपाय असतील, ते योजावे, हें कोणीही नाकबूल करणार नाहीं.
 हैं खचीत आहे कीं, लोकांमध्ये जी रीति प्राचीन काळापासून चालत आलेली असते, ती त्यांस फार योग्य वाटते; व तिचा इतर रीतींशीं फार चांगला मेळ अस- तो. पहा. आपणांमध्ये स्त्रियांस विद्या न शिकविण्याची, व त्यांची लग्ने लहानपणी करून त्यांस दासींप्रमाणें नवऱ्यांनीं वागविण्याची चाल आहे. ह्या दोनही चाली एकमेकींशी किती मिळण्यासारिख्या व साधक आहेत, ह्यांचा विचार सुज्ञांनी करावा. त्यांस चांगली विद्या भाली, तर आईबापें जो वेडावाकडा नवरा देतील • त्याच्या बटकी होऊन त्या आपल्या अमूल्य स्वातंत्र्याचा नाश करून घेतील काय. ? असो. सर्व जुन्या रीतींचा बहुधा अशा प्रकारें आंतलेआंत मेळ असतो. रीतीचें असें होत नाहीं; ह्मणजे ती इतरांशीं जमत नाहीं. तो उपयोगी व चांगली आहे, असें जरी लो- कांस वाटलें, तरी इतर वहिवाटींशी तिचा मेळ नसल्या कारणानें त्यांना तिचा त्रास येतो. मुलींस विद्या शिक- विण्याची व मुलांची लग्ने मोठेपणी करण्याची रीत. चांगली, असें पुष्कळ समजदार लोक कबूल करितील, परंतु इतर रीतींशीं विसंगत असल्यामुळे तिचा अव्हेर होतो. नव्या चांगल्या रीति ह्या आपल्या पाहुण्यांप्रमा- णें आपण लेखितों. ह्मणजे त्यांस वाखाणितों पुष्कळ, पण भापले घरी राहून नेहमीं घेत नाहीं. हा प्रकार,