पान:मधुमक्षिका.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५१ )

आहे. आणि कोणी माणसास एकादा रोग झाला, व त्यास औषध देण्याची तयारी केली, आणि तो ह्मणेल कों, “हें औषध मीं पूर्वी कधीं घेतलें नाहीं, ह्मणून हें आता माझ्याने घेववत नाहीं," तर तो तसाच बरा होईल काय ? त्याच्या विचाराचें खंडन करण्यास त्याला इतकें - च विचारावें कीं, "हा रोग तुला पूर्वी कधीं झाला होता काय ?" त्यानें "नाहीं” लटल्यावर त्यास सांगावें कीं, "हा दर्द तुला पूर्वी कधी झाला नाहीं, ह्मणून हें भौषध तूं पूर्वी घेतलें नाहीं; परंतु आतां झाला आहे, ह्मणून घेतले पाहिजे." असें जर न केलें तर कसें होईल बरें ? एक मनुष्य पूर्वी फार गरीब आणि रानटी होता; त्यास कंदमूळें खाऊन आणि झाडाच्या साली पांघरून राहावें लागत असे; त्याला दैवयोगेंकरून चांगलें अनवस्त्र मिळालें, तें अर तो न घेईल, तर त्याचे इतका दुसरा कोणी मूर्ख नाहीं.
 कालमहात्म्येंकरून दिवसेंदिवस प्रपंचांत मनुष्यास दुःखप्रद अशा गोष्टी अधिकाधिक होत चालल्या आहेत. त्यांचें निवारण जर शाहाणपणाचे उपायांनी केलें नाहीं, . तर मनुष्याची काय गति होईल ? आह्मी ह्मणतों हें खरें किंवा खोटें, हें ज्यास समजून घेणें असेल, त्यानें हल्लीं- च्या सरकारच्या राज्यव्यवस्थेकडे लक्ष द्यावें. सांप्रत प्रत्येक इलाख्यांत कायदे करणारी मंडळी मेमिली आहे. ती दरमहा निदान एक दोन नवे कायदे करिते. त्यांत राज्यव्यवस्थेचे थोडे, आणि नाना प्रकारच्या अपराधांची चौकशी करण्याचे, व ते न होतील अशा बंदोबस्ता- विषयींचे फार. ह्यावरून काय अनुमान होतें, वें