पान:मधुमक्षिका.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५० )

जन समजतात. तद्वतू, पूर्वीचा कित्ता नसतां, एकादी अचानक नवीन गोष्ट करणे, आणि तीत यश मिळविणें हें खचीत मोठ्या पराक्रमाचें व स्तुत्य कर्म होय. स्वभावतः अशी एक मनुष्याला वाईट खोड लागून गेली आहे कीं, जें पूर्वीपासून प्रचारांत आहे, तें तसेंच पुढे चालविण्याविषयीं त्याचा बहुतेक कल असावा; आाणि कांहीं नवें ह्यटलें ह्मणजे तें त्यास आवडूं नये. ही गोष्ट रीतिभाति व धर्म ह्यांस विशेष लागू पडते. उदाहरणासाठीं लांब जावयास नको. क्षणभर आपले हिंदू लोकांकडे लक्ष दिलें ह्मणजे पुरे. परंतु चांगली रीत पाडण्याविषयीं मनुष्याच्या मनांत जी बुद्धि प्रथम उत्पन्न होते, तो भारी प्रबल असते, एवढें बरें आहे. असें नसतें, तर जग सुधारतें ना. नवीन भूमि शोधून काढ ण्याविषयीं कोलंबसास जो सद्विचार सुचला, तो इतका जबरदस्त होता कीं, त्याच्या योगानें त्याला अप्रतिष्ठेची लज्जा व जीवाची भीति ह्या कांहींच वाटत नाशा झाल्या. वाफेच्या बलानें गाडी चालविण्याविषयींचा उपयुक्त वि. चार स्वीफनसन साहेबाने प्रथमतः लोकांस कळविला. तेव्हां त्याची कार थट्टा झाली, तरी तो दबला नाहीं, अशीं अनेक उदाहरणें देतां येतील. पूर्वापार चालत आलें तेंच बरें, आणि नव्याचा आपण स्वीकार करावयाचा नाहीं, असें जर मनुष्य ह्मणेल, तर औषधें जितकीं आहेत, तितकीं त्यास नव्या सारखीं, ह्मणजे पूर्वी न घेतलेलीं अर्शी असतात; कारण, कोणी मनुष्य जन्मतःच सर्वं रोगांचें घर आणि सर्व औषधे घेणारा असतो असें नाहीं. जेव्हां जो रोग होईल, तेव्हां त्याचें औषध घ्यावें, अशी रीत