पान:मधुमक्षिका.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४९ )

ह्या प्रांताची लांबी सुमारें १२० मैल, व रुंदी सुमारें ९० मैल आहे.

जुलै, १८३३.


नवी रोति.

 प्राणी जन्मतात तेव्हां शरीरानें ओबडधोबड व अव्य- वस्थित असतात. तद्वत् अपूर्व चांगल्या रीति अथवा गो-ष्टी, ह्या वेळरूप स्त्रीच्या कन्या होत, त्याही आरंभीं अगदीं सरासरीच असतात. सुईण चांगली कुशल असली ह्मणजे तिच्या हातवटीनें व कालगतीनें प्राण्यांच्या शरी• रांस जसें सुरेखपण प्राप्त होते, त्या प्रमाणे चांगल्या गो- ष्टी अथवा रीति ह्या विचारी पुरुषांच्या हाताने कालगत्या उत्तमता पावतात. मोठा पराक्रम करून जो पुरुष स्वकुलास नीचदशेतून काढून सन्मान्य पदवीस आणितो, तो, त्याही पेक्षां मोठ्या मोठ्या वैभवशाली त्याच्या वंशजांपे - क्षां सुपूज्य होय. मराठी राज्याची स्थापना करणारा राजा शिवाजी भोंसला, हा स्ववंशजांपेक्षां किती एक गुणांहीं जरी कमी होता, तरी, सर्व मराठे लोक, केवळ त्यालाच नव्हे, तर त्याचे हातची भवानी नाम- कजी प्रसिद्ध तरवार, तिलाही अद्यापपर्यंत देव समजू- न भजतात. त्याप्रमाणेंच जनांतील चांगल्या गोष्टी- चें आहे; ह्मणजे, त्यांचा ज्यांनीं पाया घातला, ते पूज्य होत. ह्याचें कारण असें कीं, पूर्वीच्या पैशाचा व्यापा- र करून तो वाढविणें हें शाहाणपणाचे काम आहेच; परंतु, पूर्वीची पुंजी नसून नवी कमाई करून ती वाढवून श्रीमान् होणें, हें मोठया अकलेचें काम आहे, असे