पान:मधुमक्षिका.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५)


अक्षरशून्य राहण्याचा निश्चय धरून चालतात, ते दे- खील, ज्यांस सामान्य लिहिणें वाचणें व अल्पस्वल्प गणित येतें, त्यांस मोठे दैववान मानितात; ह्यावरून पाहा. ख- रोखर चांगल्या गोष्टीस वाखाणणें, ह्यास फारसा सुज्ञप णा लागतो, असें नाहीं; तर जे चांगले व उपयुक्त आहे, त्याचें हरप्रयत्नानें संपादन करून, त्याचा यथायोग् उपयोग करणे, हेंच शाहाण्याचें लक्षण होय.
 विद्येचा उपयोग केवळ पुस्तकें शिकल्याने होत नाहीं. त्यास पुस्तकांबाहेरचें व्यवहारज्ञान पाहिजे. तें ज्ञान, विचारपूर्वक अवलोकनानें व अनुभवानें प्राप्त होत असतें. पुस्तकांवरून शिकलेल्या अनेक विषयांवर वाकूपांडित्य करणारे असे विद्यार्थी शाळांत पुष्कळ तयार होतात. पण सगळें साहित्य पुढे ठेवून, जें बोलतां तें करून दाखवा, असे सांगितलें असतां, पुढे सरणारा शतांमध्ये एकादाच निघेल. संकटांतून पार पडण्याच्या, व उद्योगानें स्वहित करून घेण्याच्या पुष्कळ युक्ति, विद्यार्थी जनांनी पुस्तकांत वाचिलेल्या असतात; व त्या त्यांस आठवतही असतात. प रंतु, त्यांचा उपयोग कोठें कोणत्या प्रकारें करावा, हें व्यव- हारज्ञान त्यांस नसल्यामुळे, ते विद्वान् असूनही त्यांस अ विद्वानांपेक्षां कधीं जास्त विपत्ति भोगाव्या लागतात. ह्याचें कारण असे की, त्यांचें बहुतेक आयुष्य केवळ ग्रांथिक ज्ञान संपादण्यांत गेलेलें असतें; आणि त्याचा उपयोग करण्यास आवश्यक जैं व्यवहारज्ञान तें संपादण्यास त्यांस मुळींच अवकाश होत नाहीं. तर असे करूं नये. कोणतीही उत्तम वस्तु महा प्रयासाने मिळविली, पण तिचा उपभोग जर आपणास घेतां येत नाहीं, तर