पान:मधुमक्षिका.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४८ )

लते होतात. बहुतेक स्त्रियांस नृत्य येत असतें.त्या आपले नवरे व इतर आप्त खेरीज करून, बाकी सर्व लो- कांसमक्ष खुशाल नाचतात.
 हिरात येथे रेशमी काम फार चांगले करितात. त्यां-त चाबुकांविषयीं तर फारच आख्या आहे. तेथील चाबूक सुरेख असून टिकाऊ असतात. हा प्रांत पि- काऊ आहे. ह्याचे चार सुभे आहेत. १ ओवी, २ घ- र्यान, ३ कर्ख, आणि ४ सावझवार. ओबी सुभ्यांत धातू- च्या खाणी अनेक आहेत. आणखीं त्यांत एक उष्णो- दकाचा झरा आहे. त्यांत भाजारी मनुष्पानें स्नान के - असतां तो तत्काळ बरा होतो. ह्यांत बहुधा इमक- लोक राहतात. ते लुटारू आहेत. दुसरा प्रांत घ- र्यान, हा सपाट मैदान आहे. ह्यांत हिंगाची झाडें मनस्वी आहेत. तेथें तो पुष्कळ उत्पन्न करितात. त्याची रीत अशी. काकिस नामक अफगाणजातीचे लेक आपल्या बायकामुलांसह त्या वनांत येतात; आणि त्या झाडांस चाकूनें वगैरे भेगा पाडितात; आणि त्यांवर सूर्यकिरण पडूं नयेत ह्मणून कांहीं दगड किंवा चिखल ह्याचा भडवसा करून ठेवितात. रात्रीं त्या झाडांवर दहिंवर पडून त्या भेगांतून चिखालसारखा कांहीं पातळ पदार्थ बाहेर येतो. तो वायानें अमळसा वाळला ह्मणजे, सकाळच्या प्रहरीं ते लोक गळ्यांत कातड्याच्या पिशव्या अडकवून तेथें येतात, आणि तो काढून घेतात. हें झाड सुमारे दीड यार्ड लांब असते. ह्याचीं पाने मोठी असतात.