पान:मधुमक्षिका.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४७ )

वयाचा आहे.त्याचेठायीं राजतेज कांहीं दिसत नाहीं. दारू, भांग, आणि अफू, ह्यांचे अंमलांत तो नेहमीं मन्न असतो. न्याय कसा तो त्याच्या स्वमींही वसत नाहीं. नटांत त्याचा सर्वकाळ जातो. त्याची बदचाल सर्व अफगाणिस्थानभर प्रसिद्ध आहे. त्याला चार बायका, दाहा पुत्र, आणि साहा कन्या आहेत. त्याजपाशीं जवाहीर पुष्कळ आहे, तें त्यानें एका लोखंडी पेटींत घालून जमीनींत पुरून ठेविलें आहे, असें सांगतात. प्रजेपासून हरत-हेनें दररोज १०० रुपये काढून खजीन्यांत जमा करण्याविषयीं त्यानें कोतवालास हुकूम केला आहे. त्याप्रमाणें तो चालतो. त्या खजीन्यांतला पैसा तो कधीही खर्चीत नाहीं. खर्चाचें कारण . पडेल, तेव्हां लोकांपासून पैसा उत्पन्न करितो. त्याला इराण सरकारचें फार भय वाटतें. ह्मणून तो इंग्लिश सरकाराशीं सल्ला करावयास इच्छितो. तो आपल्या प्रधा- नास फार भितो; आणि त्याचे संमतावांचून कांहींच करीत नाहीं. सगळ्या अफगाणिस्थानांत पाषाणहृदय पुरुष दुसरा कोणी नाहीं. त्याचे सार- त्याचेठायीं राजतेज कांहीं दिसत नाहीं.त्यानें यःकश्चित् कारणावरून गरीब लोकांस ठार मारिलें आहे.
 राजा इतका जुलुमी आहे, तरी हिरातांतले लोक फार चैनी आहेत. बागांत जाऊन खाणेपिणें, नाचतमाशे, रंग, ह्यांत ते पुष्कळ दिवस घालवितात. बायका सुंदर आहेत. त्या शहरांत असतात तोपर्यंत मात्र डोक्यापा- सून तों पापांपावेतों अगदीं बुरखलेल्या असतात. परंतु, एकदां वेशीच्या बाहेर पडल्या, ह्मणजे त्यांस लज्जा नाहींशी होते. रस्त्यांतून जाणारांच्या त्या अशा थट्टा करितात कीं, ते निमूटपणें खालीं मान घालून पुढे चा-