पान:मधुमक्षिका.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४६ )

सर्वांत संपत्तिमान् आहे. त्यास सावकारांचा राजा असें ह्मणतात.
घरे सर्व मातीचीं बांधलेली, काळीं व ओंगळ दिसतात. बहुतेक घरें दुमजली आहेत. त्यांची डागडुजी अथवा स्वच्छता ह्या गोष्टी लोकांच्या स्वप्नांतही नाहींत, अशा दिसतात. दरवाजे फारच लहान असतात. तथापि, घरांत जागा पुष्कळ असते. खिडक्यांस कागद लावितात. आर्ग ह्मणजे राजवाडा ही इमारत फार बळकट व प्राचीन आहे. तिजसभोवता लहानसा कोट असून त्याचे बाहेरचे आंगास खंदक आहे. बुरुजावर राजाचें भांडार असतें. तथापि तेथें तोफा वगैरे कांहीं नाहींत. खंदकावरून वाड्यांत जाण्यास लांकडी पूल आहे; तो रात्रींचा काढून ठेवितात. ह्या वाड्यापेक्षां इंग्लिश सर- कारच्या राज्यांतले तुरुंग देखील पुष्कळ स्वच्छ, मजबूद आणि सुरेख असतात.
शहरामध्यें सुंदर काम झटलें ह्मणजे एक तलाव- मात्र आहे. तो हिजरी सन ९२५ ह्या वर्षी बांधिला, असा त्याजवर लेख आहे. ह्या तलावासमोर एक तुरुंग आहे. त्यास दरवाजे अगदी लहान असून खिडक्या मुळींच नाहींत. आणि ती जागा फार दमसर आहे, तेणेंकरून कैदी बिचारे फार लवकर मरतात. त्यांची सुटका केवळ राजाच्या मर्जीवर आहे.
 शहरांत घरे सुमारे ४००० • ० आहेत.त्यांत अदमासें ६०००० लोक राहतात.त्यांत बहुतेक बरदुरानी लोक आहेत. ह्या प्रांतावर प्राचीनकाळापासून सुमारें ३९ राजांनी राज्य केलें. हल्लींचा राजा ५८ वर्षांच्या