पान:मधुमक्षिका.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४५ )

दोघेही कामातुर झालीं. स्त्री उठून खोलीमध्यें विद्यार्थ्यांकडे गेली, आणि तिनें दार लावून घेतलें. हें वर्तमान गाहरशद हिला समजलें, तेव्हां ह्या तरुण स्त्रियांचा शाप वृथा आपले माथां कशाला पाहिजे, असें मनांत आणून तिनें आपल्या सगळ्या सोब- तिणींचीं लग्नें त्या विद्यार्थ्यांबरोबर करून दिली. परंतु, त्यांचे अभ्यासांत व्यत्यय येऊं नये ह्मणून, त्यांनी आठव- ड्यामध्ये फक्त एकदां आपल्या बायकांची गांठ घ्यावी, अशी मर्यादा स्थापिली.<br.  हिरात प्रांताचें एकंदर उत्पन्न १८३०४ तोमन आहे. एक तोमन ह्मणजे पावणेसात रुपये.धान्य ३३३२० खारव्हर पिकतें.एक खारव्हर साहा मण आणि दाहाशेर, इतक्याबरोबर आहे.
 ह्या शहराचा मूळ पाया लोहरास्प नामक राजानें घातला, अशी दंतकथा आहे. एका पर्शियन श्लोकांत असें सांगितलें आहे कीं, "हिरात हैं लोहरास्प ह्यानें बसविलें; गस्ताप ह्यानें त्यांत पुष्कळ इमारती बांधिल्या; वाहमान ह्यानें तें पुष्कळ वाढविले; आणि अलेक्झांदरानें तें शेवटास नेलें." शहरासभोवती मातीचें कुसूं व बाहेरून कोरडा खोल खंदक आहे. वेशी पांच आहेत. सात धर्मशाळा आहेत. पहिली, जी मुस्ताफी ह्यानें बांधिली आहे, तींत शिकारपूरचे हिंदू व्यापारी राहतात; दुसरत बुखारा आणि कंदाहार येथील व्यापारी असतात; तिसरींत पर्शिया व हिरात येथील उदम्यांचें राहणें आहे; भाणि बाकीच्या, मोठमोठ्या श्रीमान् व्यापाऱ्यांनीं व्यापिल्या आहेत. हाजी अल्ली असकर कंदाहारी, हा व्यापारी

२३