पान:मधुमक्षिका.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४४ )
मोहनलालाचे प्रवासवर्णन.
हिरात.

ह्या शहरांत गुजरबाग ह्मणून एक स्थल प्रसिद्ध हे, तें पाहण्यास मी गेलो. तेथें अबुइस्माल नामक • महापुरुषाची कबर आहे. तो स्वपातकाचें प्रायश्चित्त करीत असतां त्याला मुलांनी दगडमार केली. तिच्या योगानें तो इ० स० १०८८ च्या मार्च महिन्यांत मरण पावला. त्याला बारा लक्ष श्लोक तोंडपाठ येत होते, व दोन लक्ष अभंग त्याने नवे केले, असें सांगतात. काय विलक्षण स्मरणशक्ति !!
ह्या शहरच्या उत्तरभाग, जेथें प्राचीनकाळीं मोठें विद्यालय होतें, तें स्थळ मी पाहावयास गेलों. त्याची इ- मारत पडून जमीनदोस्त झाली होती. त्या विद्याल- याचा मुख्य गुरु जेमी नामक कवि होता, असे सांगतात. जवळ नदीच्या बाजूस अमीर तैमूर ह्याची कन्या गाहर- शद, हिची कबर आहे. तिनें लग्न केलें नव्हतें.ही स्त्री फार रूपवती होती. कुराणपठणांत तिनें आपला जन्म घालविला. तिचें आचरण फार शुद्ध असे. भ- शी एक गोष्ट सांगतात कीं, ही स्त्री, आपल्या २०० मैत्रिणींसहवर्तमान एके दिवशीं विद्यालयांत गेली, आ- णि तिनें तेथच्या सर्व विद्यार्थ्यांस बाहेर जाण्यास सांगि- तलें. ते सगळे निघून गेले.परंतु, एक असामी एके खोलींत स्वस्थ निजला होता,त्याला हे बाहेरचें वर्तमान कांहींच समजलें नव्हतें.तो जागृत होऊन बाहेर पाहूं लागला तों, एके स्त्रीचें मुखकमल त्याचे दृष्टीस पडलें.तिचीही नजर त्याजकडे गेली.