पान:मधुमक्षिका.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४३ )

हे, तें खरें नाहीं; असत्य आहे. तथापि त्यापासून वा ईट परिणाम व्हावयाचा नाहीं. कां कीं, तें खरोखर घडलेलें नाहीं तरी त्यांतल्या गोष्टी होण्यास शक्य आहे- त, व त्यांपासून मनुष्यास सुबोध प्राप्त होण्याजोगा आहे, ह्मणून तीं वाचावीं, असा ग्रंथकारांचा उद्देश लोकांत व्यक्त आहे. ह्यावरून एक चमत्कारिक गोष्ट मनांत येते. ती अशी. सत्यामध्ये जर थोडें असत्य मिसळलें, तर जनांत मोठे पाप मानितात; परंतु, मुक्तमालेप्रमाणे जर सबंद असत्य लिहिलें, तर त्याचें कांहीं नाहीं. ह्याचें. कारण काय ? आपण आपल्या सत्यभाषणांत जें असत्य भाषण मिळवितों तें सत्य मानण्याविषयीं जनांत आग्रह करितों, ह्मणजे त्यांस फसवायास पाहतों, ही आपली लबाडी, ह्मणून तें पाप होय; आणि मुक्तमालेसारख्या गोष्टींत तसा कांहींच प्रकार नसतो; ह्मणजे तो असते खोटोच, परंतु, ती खोटी समजूनच लोकांनी वाचावी असा ग्रंथकाराचा हेतु असतो; तेव्हां तो जनांस ठकवूं पाहात नाहीं, हें उघड आहे; ह्मणून तें पाप नव्हे; व ह्मणूनच लोक त्याचा द्वेष करीत नाहींत. तस्मात् मन हेंच सत्य आहे. जसे आपल्या मनांत आले असेल तसें सांगणें, हेंच सत्य भाषण. ह्या परतें जें बोलणें तें असत्य होय. ह्या असत्यानें जगांत केवढाले अनर्थ मांडिले आहेत, ते कोणाच्यानेही संपूर्ण सांगवणार नाहींत. हरहमेषा राजा नवेनवे कायदे करितो, ह्मणून लोक त्याच्या नांवाने हाका मारितात, हा राजाचा दोष नाहीं; त्यांचाच आहे. ही गोष्ट फार खोल नाहीं; • हणून मी ती उदाहरणानें स्पष्ट करीत नाहीं.