पान:मधुमक्षिका.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४२ )

णाराचा कांहीं एक हेतु नसतो. तर, गोष्टी निघाल्या ह्मणजे, 'आठ हात लांकूड आणि नऊ हा ढलपी' अशा गप्पा माराव्या, अशी मनुष्यास सवयच पडून गेली आहे. तिजपासून आपलें कांहीं हित नाहीं, असें त्याला उघड कळत असतांही, तो त्या दुष्ट सवयीचा त्याग करीत नाहीं. तेव्हां त्याला काय ह्मणावें ? वाणी आपल्या मालाची किंमत सांगतो, अथवा कोणी मनुष्य आपल्या शत्रूची निंदा करितो, तेव्हां, ह्यांत खचीत लबाडी आहे, भसें तात्काळ ऐकणाराच्या मनांत येतें; व त्यांतलें तथ्य 'काय तें बाहेर काढण्याविषयीं तो उद्योग करितो.कां कीं, त्यांत धनप्रतिष्ठादिकांस धक्का असतो. परंतु उगेंच सामान्य गोष्टींत जर कोणी तिखट मीठ घातलें, तर त्यापासून नफा नुकसान कांहीं नसल्यामुळे त्याविषयीं. चा फारसा शोध करण्यास कोणाला बनत नाहीं; व आवडतही नाहीं. आणखी त्यापासून दुसरे असें आहे कीं, गप्पा मारणाराची हौस विनखर्चानें पूर्ण होते, व बुद्धचा गोड केलेली गोष्ट श्रोत्यांसही बरीच मनोरंज- क वाटते. ह्या कारणामुळे अशा असत्यभाषणाचा प्रकार . जनांत फार वाढला आहे. तो इतका की, त्याच्या योगा- नें कितीएक मनुष्यें कांहीं दिवस पावेतों बहुभाषपणा करून लोकांची मर्जी संपादितात. तरी, केव्हांना केव्हां . तरी त्यांची लवाडी बाहेर पडते. आणि ती बाहेर पडली ह्मणजे जी त्यांची नापत व मानहानि होते, ती सांगतां पुरवत नाहीं.
 आणखी एक असत्याचा प्रकार आहे. मुक्तमाला, रत्नप्रभा, इत्यादि पुस्तकांत लिहिणारांनीं जें लिहिलें भा-