पान:मधुमक्षिका.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४१ )

मंडळींतही होऊं सकत नाहीं, त्या असत्यभाषणानें वि- चारी पुरुषानें आपलें पवित्र मुख विटाळावें काय ?
 असत्य भाषण करणारास सर्व सोडितात. त्यावर कोणी विश्वास ठेवीत नाहीं. सज्जन जे आहेत, ते असत्य बोलणाराचा द्वेष करितात, हें प्रसिद्धच आहे; आणि वर सिद्ध केल्याप्रमाणे, दुर्जनही त्याला भापणा- जवळ येऊं देत नाहींत ; तेव्हां जगांत त्याला ज्यानें त्यानें झिडकरावे, असें झालें कीं नाहीं ? ह्याहून अधिक नीचत्व तें कोणतें ? सरथामस ब्रौन ह्मणून एक इंग्लिश ग्रंथकार होऊन गेला. त्यानें आपले पुस्तकांत जनाला लक्षून असें लटले आहे कीं, "अरे, सैतान देखील एक- मेकांशी असत्य भाषण करीत नाहींत ; आणि नरकवास कंठणाऱ्यांस देखील सत्यावांचून परिणाम नाहीं. ' ह्या वरून, सत्य भाषणाची आवश्यकता मनुष्यास किती आहे, हे सहज लक्षांत येईल. हा दुर्गुण इतका द्वाड • आहे, त्या अर्थी तो टाळण्याविषयीं होईल तितकी साव- - धगिरी ठेवणें हें मनुष्याचे कर्तव्य आहे. निदान, त्याच्या स्वीकारानें जो लाभ होणार, तो त्यापासून हो- हानी इतका आहे कीं नाहीं हें तरी पाहावें. आणि असा लाभ घडोघडी आढळेल, असेंही वाटत नाहीं. असें आहे तरी जन पावलोपावलीं असत्य बोलतात. मनुष्य समाजांत असतो तेव्हां मला वाटतें, त्याच्या कान असत्य भाषण पडल्या वांचून त्याची एकही घटिका जात नसेल. त्या भाषणापासून ह्मणजे लोकां- स दुःख व्हावें, आणि आपणास सुख व्हावें, असा बोल•