पान:मधुमक्षिका.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४० )
असत्य भाषण.

 लेतोचा शिष्य आणि शिकंदराचा विद्वान गुरु जो आरिस्तातल, त्यास एके समयीं कोणीं असें विचारिलें कीं, "खोदें बोलण्यानें मनुष्यास काय प्राप्त होतें ?". त्यानें उत्तर दिलें “अविश्वास ह्मणजे नापत." खरे आहे. अमुक मनुष्य खोटें बोलतो, असें एकदा आपले अनु- भवाला आलें, ह्मणजे तो जरी दुसरे वेळी खरें सांगू लागला, तरी त्यावर आपला विश्वास बसत नाहीं.
 जो ढुंगणाचें सोडून डोक्यास गुंडाळतो, अशा नि- र्लज्ज व हलक्या मनुष्यास देखील, आपण सत्य बोलतों अशा आख्येची आवड असते. दुर्गुणी जनांस समान- शील स्नेही मिळतात. अमली पुरुषास मंडळीचा तोटा नाहीं; कां कीं गांवांत कोणी पांच चार तरी तसे असतात; आणि त्यांच्या मध्ये पहिल्या धडक्यास चिल- मीची राख केल्याने, अथवा प्रसंगी अमलासाठी घरांतील भांडें मोडिल्यानें शाबासकी मिळते. अठ्ठल चोर, उ. चल्ये, द्रव्यार्थ मनुष्यास जिवें मारणारे, हे तर दुष्टाश- रोमणीना ? त्यांतही जो हजारपांचशे माणसांसमक्ष ए. काद्या मोठ्या दागिन्यास उपटा देऊन आपल्या मंडळीं- त घेऊन येतो, त्याची त्याचे सोबती पाठ थापटितात. पण तेंच जर त्यांस न कळू देतां एकटाच बळकावून बसेल, तर ते त्याला पुनः आपले मंडळीत घेतील काय? इतर पुष्कळ दुर्गुणांत मनुष्ये एकमेकांवर वरचढ होऊं : इच्छितात, परंतु असत्य भाषणाविषयीं असें कोठें आद- ळतें काय ? ज्या दुर्गुणाचा समावेस दुर्गुणशिरोमणींच्या