पान:मधुमक्षिका.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४ )


वील, त्या सफल होण्याविषयीं झटणें, आणि वाईट अ सतील त्या सोडणें, हें मनुष्याचें मोठे कर्तव्य आहे. हें साधण्यास विचार पाहिजे आणि विद्येवांचून विचार नाहीं. तेव्हां, ह्या लोकीं, विद्येपासून मनुष्यास अनिर्व- चनीय लाभ आहेत, हे उघड आहे.
 पुस्तकांतही कितीएक गोष्टी अशा सांगितलेल्या असतात की, त्यांप्रमाणे प्रसंगविशेषों वागलें असतां मात्र हित होतें; सर्वदा होत नाहीं. तर त्यांविषयीं फार ज पढ़ें पाहिजे. त्यांवर विश्वास ठेवून उपयोगीं नाहीं. ह्मणजे, त्या असत्य मानाव्या, असे आह्मी सांगत नाहीं. परंतु, आपले स्थितीशी त्यांची अनुकूलता नसल्यास त्या वर्जाव्या. दुग्ध हा पदार्थ निरोग्यानें सेविला असतां बलप्रद होतो खरा; तथापि तोच पदार्थ संनिपात किंवा कफदोष झाला असतां सेविल्यास प्राण हारक होतो. ही च गोष्ट सर्वत्र लागू करावी.
 मूर्खजन विद्येचा तिरस्कार करितात. ठीकच आहे. कुत्र्यानें कस्तूरी कर्दम मानिली, तर त्यांत कांहीं नवल नाहीं. कांकों, तिच्या गुणाचा अनुभव त्याला स्वतः घेतां येत नाहीं; व इतरांनी घेतलेला समजण्याचीही त्या- ला शक्ति नाहीं. तेव्हां त्याजकडे काय बोल. ? किती- एक मूंढ लोक, " कोल्हा आणि द्राक्षे, " ह्या न्यायानें- ही विद्येस वाईट ह्मणतात. परंतु विद्येस मनापासून बाईट ह्मणणारा असा मनुष्य फार विरळा. कांकीं, ती पाहिजे त्या कामास साह्य देण्यास. सिद्ध असते. भील, कोळी वगैरे लोक, की ज्यांच्या वंशांत कधीं कोणीच पांढऱ्यावर काळे केलें नाहीं, व जे स्वतः तसेच