पान:मधुमक्षिका.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३७ )


त मरण पावला.नंतर एदवर्दधिकनफेसर नामक इंग्लंदच्या मूळ साक्सन राजकुळांतला राजा देशामध्यें राज्य करूं लागला. तो इ० स० १०६६ त वारल्या- वर, त्याची गादी, त्याचा शालक हारोल्द, ह्याने बळका विली. परंतु, एदवर्दाच्या मृत्युपत्राप्रमाणें हाटलें असतां नार्मंदीचा द्यूक विलियम ह्यास ती मिळावयाची; ह्मणून ती त्यानें त्याच वर्षी हारोल्दास हेस्टिंग्ज येथील लढा- ईंत मारून मिळविली. इंग्लंदच्या इतिहासांत 'नार्मन विजय' ह्मणून जी प्रसिद्ध गोष्ट आहे, ती हीच. विलियम - ह्यास राज्याभिषेक झाल्यावर त्याला लोक विलियम विजयी असें ह्मणं लागले. नार्मन राजांच्या कारकीर्दीत इंग्लंदामध्यें देशसुधारणा, कायदे, उत्तम रीति आणि लोकहिताच्या गोष्टी वृद्धि पावल्या. नार्मन विजयापा- सून आजपावेतो इंग्लंदच्या राज्यांत ज्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या झाल्या, त्यांपैकी मुख्य मुख्य सांगतों.
 १ ; दुसऱ्या हेनरीच्या कारकीर्दीत, इ० स० ११७२ मध्यें, ऐर्लंदचें राज्य इंग्लंदच्या राज्याशी जोडलें. २, जान राजानें, इ० स० १२१५ त, 'मानाचा' ह्या नांवा- च्या प्रजेच्या स्वातंत्र्याच्या सनदेवर सही केली. ३; तिसरा एडवर्ड आणि पांचवा हेनरी ह्यांनी फ्रान्सावर स्वाऱ्या केल्या. ४; ख्रिस्ती शकाच्या पंधराव्या शत- कांत पार्क आणि लांकास्तर ह्या घराण्यांचीं युद्धे झाली. ५; इ० स० १६०३ त पहिला जेम्स गादीवर बसला, तेव्हां इंग्लंदाच्या व स्कातलंदाच्या राज्यांची एकत्रता झाली. ६; पहिल्या चार्लस राजाच्या व त्याच्या प्रजे- च्या लढाया होऊन लोकांनीं त्याचा वध केला, नंतर