पान:मधुमक्षिका.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३६ )




न तत्रितनांत राहिले.चोहींकडे आंग्लो साक्सन लोकांचा अंमल पसरला. ह्या लोकांच्या नांवापासून- च, त्या देशाला इंग्लंद हें नांव प्राप्त झालें आहे. साकू- सन लोकांनी ह्या देशांत वेगवेगळीं सात राज्य स्थापि लीं. तीं, इतिहासामध्यें, साक्सन राज्यसप्तक या नांवानें . प्रसिद्ध आहेत.
 साक्सन लोकांच्या तडाख्यांतून निभावून जे ब्रितन लोक पळाले, ते वेल्स प्रांतांत, आणि फ्रान्स देशामध्यें • बितनीनामक भागांत जाऊन राहिले. वेल्सांतले ब्रि तन लोक पहिल्या एदवर्द राजाच्या कारकीर्दीपावेतों स्वतंत्र होते.त्यांच्या वंशजांस आद्यापि प्राचीन त्रि- तन असें ह्मणतात.
 साक्सन लोकांच्या अंमलांत ह्या देशाचें नांव, रीति- भाती, व भाषा, हीं बदललीं. लोक पूर्वी लातिन आणि • केचोहींकडे आंग्लो साक्सन  इ० स ० ८ २७ त, राज्य सप्तकापैकी कितीएक राज्ये ' मोडून, वेसेक्सचा राजा एग्वर्त ह्याने एक मोठें राज्य स्थापिलें, व देशास इंग्लंद हें नांव दिलें. तेव्हां इंग्लंद- चा प्रथम राजा एग्बर्त, असें ह्मणण्यास कांहीं चिंता नाहीं.
 इ० स० ८६६ त देन्स लोकांनीं इंग्लंदावर स्वारी केली; आणि इ० स० १०१७ त बहुतेक सर्व देश आपले कबजाखाली घेतला. तेव्हां त्यांचा राजा कँनत हा होता. ह्या लोकांस इंग्लंदाच्या आल्फ्रेद राजानें जर्जर करून देशांतून घालवूनही दिलें.
कँनूत ह्याचा पुत्र हार्दिकँनूत हा इ० स० १०४२