पान:मधुमक्षिका.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३५ )



होता, तो ह्या कालाच्या सुमारास अगदीं लयास गेला. ही गोष्ट इतिहास वाचतो त्याच्या हरहमेष दृष्टीस पडते. असें कां होतें बरें ? देशसुधारणा आणि स्वदेशाभिमान ह्यांचें वैमनस्य आहे काय ?
 ब्रितनदेश उघडा पडला; त्यास कोणी त्राता नाहीं- सा झाला; असें पाहून पिक्त आणि स्कात् लोक त्या- वर स्वाऱ्या करूं लागले. त्यांजपासून आपला ब- चाव करून घेण्यासाठीं ब्रितन लोकांनीं रोमन लोकांची प्रार्थना केली. परंतु त्यांचीच त्यांना पंचाईत पडली होती. तेव्हां ह्या विचाऱ्यांकडे लक्ष देतो कोण ? आ- धी पोटोबा आणि मग विठोबा. आधीं स्वसंरक्षण, तेव्हां पुढे परोपकार. असा मानवस्वभाव असल्यामुळें ती प्रार्थना व्यर्थ गेली. नंतर, जर्मनीच्या उत्तरभागी राह- णा-या साक्सन लोकांस ब्रितन लोकांनी स्वशत्रूशी लढ- . ण्यास सहाय करावयाकरितां बोलाविलें ; आणि त्यांच्या मद- तीवद्दल त्यांस थानेत हैं बेट देऊ केलें. ते लोक, हेंजिस्त आणि हार्सा ह्या सरदारांसह वर्तमान, इ० स० ४४९ तिन देशामध्ये आले; आणि त्यांनी मोठ्या शौर्यानें पिक्त आणि स्कात् ह्या लोकांस देशांतून घालवून दिलें. तेणेंकरून ब्रितन लोक स्वतंत्र आणि स्वस्थ झाले काय ? नाहीं. ते चुलींतून निघाले आणि बैलांत पडले. ह्मण- जे असें झालें कीं, साह्य करण्यास आलेल्याच साकूसन लोकांनीं ब्रितनावर शस्त्र धरिलें, आणि आग्नेपीकडच्या कितीएक भागांतून त्यांस काढून दिलें. देशांत साक्- सन लोकांचा अंमल बसत चालला. आंग्लो साक्सन ह्मणून त्यांच्याच जातीचे लोक जर्मनींतून निघून जाऊ-