पान:मधुमक्षिका.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३४ )


तेथपर्यंत त्या प्रदेशांची माहिती कांहीं समजत नाहीं. पुढे थोडथोडी कळू लागते.
जूलियस सीझरानें ग्रेवबितनावर स्वारी केली, तेव्हां तेथचे लोकांस त्रितन ह्मणत असत; देशाला ब्रितानिया असें नांव होतें; सुधारणा तर कांहींच नव्हती; लोक कातडीं पांघरत; झाडपाल्याच्या रसानें आंगे रंगवीत; फळें मुळें आणि शिकार ह्यांवर उपजीवन करीत; चिख- ल आणि वृक्षांच्या शाखा ह्यांनीं बांधिलेल्या ओबड धोब- ड घरांत राहात; अशी त्यांची स्थिति होती. तरी ते शूर असत, आणि प्रसंग पडल्यास मोठ्या शौर्यानें लढत. तेर्णेकरून त्यांस जिंकण्यास जूलियस सीझराच्या सैन्यास फार श्रम पडले. ह्या मोहिमेनंतर सुमारे १०० व- षांत रोमन लोकांकडून ब्रितनास कांहींएक इजा पोहों- चली नाहीं. पुढे इ० स० ४३ त, ब्रितनास पुरतें जिंकण्यासाठीं, क्लादियस नामक रोमन वादशाहानें मोठें सैन्य पाठविलें. तथापि ह्या गोष्टीनंतर २० वर्षांनीं, तें कार्य अग्रिकोला नांवाच्या सरदाराने सिद्धीस नेलें.
ब्रितनदेश सुमारें इ० स० ४३० पावेतों रोमन लोकांच्या अमलाखाली राहिला. परंतु, त्याच सुमारा- स त्यांच्या स्वतःच्या देशावर ह्मणजे इतालीवर, उत्तरेक- डोल रानटी लोक हल्ले करूं लागले, ह्मणून स्वदेशसंरक्ष- णार्थं रोमन लोकांनीं ब्रितनांतली आपली सर्व फौज परत बोलावून नेली. तेव्हां अर्थात त्यांची सत्ता तेथें राहि- ली नाहीं. ह्यांच्या कारकीर्दीत लोकांच्या रीतिभातींची वगैरे बरीच सुधारणा झाली. परंतु, स्वदेशाभिमान ह्मणू- म जो मोठा गुण त्यांजमध्ये रानटी स्थितींतही वसत