पान:मधुमक्षिका.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३३)


एक पुरवठ्यास येत नाहीं. आणखी मला असे समजलें आहे कीं, मातारे कोतारे, आंधळे, बहिरे, मुके, पांगळे, थोटे, अशा अनाथांस आश्रय देण्यासाठी लोकांवर एक लहानसा करही बसविला आहे. तरी त्यानेही पूर्तता होत नाहीं.
 ह्या देशांतील लोकांची आदरसत्कार करण्याची उत्तमरीति पाहून मला परम संतोष झाला. आणि त्यांनीं माझें बहुत आगतस्वागत केलें, ह्मणून मी त्यांचे फारफार आभार मानितों.
 ग्रेब्रितन व ऐल्द ह्यांचा संक्षिप्त इतिहास. इंग्लंदामध्ये प्राचीन काळी ह्मणजे आरंभी केल्त लोक राहात असत. ते मुळीं एशिया खंडांतून येऊन युरोपाच्या दक्षिणेकडे व पश्चिमेकडे वसत गेले. नंतर त्याच्या उत्तर भाग व पूर्व भागी बेलजी लोक येऊन राहिले. त्यांचे मूळ स्थान एशिया खंडच होते. ह्यांबरोबर गाथिक लोकांच्या आणखी कितीएक जाती युरोपांत शिरल्या. त्यांनी उत्तर आणि ईशान्य ह्या दिशा व्यापून टाकिल्या. ह्या प्रकारें सर्व युरोप खंडांत बसाहात झाली. एशिया खंड हें मानत्री प्राण्यांचें मूळस्थान आहे, असे विद्वज्ज- नमत आहे..

 फिनीशियन लोक कार्नवाल येथून कथील विकत नेत असत, तें केव्हां पासून हैं बरोबर सांगतां येत नाहीं.' तथापि ख्रिस्ती शकापूर्वी शेंकडों वर्षे हा व्यापार चाल ला असावा, असें सांगतात. जूलियस सीझराने ख्रिस्ती सनाच्या पूर्वी ५५ वे वर्षी येतनितनावर स्वारी केली,

१२