पान:मधुमक्षिका.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३२ )


तरी त्याला लिहितां आणि वाचतां हैं येत असतेच. ज्याला ह्या दोन गोष्टी येत नाहींत, अशीं माणसें त्या देशांत फार निघावयाचीं नाहींत. मेंढरें राखणारा आणि हुजा, हे एका कोपऱ्यांत बसून वर्तमानपत्रे वाचतांना व त्यांविषयीं बोलतांना मी पाहिले आहेत. वाचणें हैं आपलें कर्त्तव्य व करमणुकीचें उत्तम साधन आहे, भ ते समजतात. हल्ली सरकारचे विचार काय चालले आहेत, त्यांविषयीं ते बोलतात. अशी उत्तम स्थिति आप- ल्पा हिंदुस्थानाला कधीं प्राप्त होईल काय. ?
 इतर देशांमध्ये पाहिलें तर लोकांचा वेळ जातां जात नाहीं; ह्याचें कारण काय ? तर त्यांस कांहीं उद्यो ग नसतो; परंतु, त्याच्या उलट स्थिति इंग्लंदांत आढळून येते. ती अशी की, कोणालाही एका क्षणाची फुरसद नाहीं. ज्याला त्याला पाहावें तो वेळ नाहींसा वाटतो. स्वतः माझीच गोष्ट मी सांगतों कीं, माझे मनांत ज्या ज्या गोष्टी करावयाच्या असतात, त्या करण्यास मला वेळ पुरत नाहीं..
 मोठा कळवळा येण्यासारखी एक गोष्ट मी इंग्लंदांत पाहिली; तो हीच कीं, येथें हजारों, लाखों लोक दारि- द्र्याने पीडलेले आहेत. एशिया खंडांतील देशांपेक्षां, सं पत्ति व श्रीमान् लोकांची संख्या इंग्लंदांत पुष्कळ जास्त आहे. तरी अन्नवस्त्रावांचून मरणारे लोक ह्या देशांत आहेत इतके दुसरे कोठें नसतील. त्यांस आश्रय द्यावा, ह्या हेतूनें तेथें अनेक मंडळ्या स्थापिल्या आहेत, व त्या, वर्गणीचा पैसा जमवून त्यांस साह्य देतात. पण त्यानें होणार काय. ? भिकार अतिशयित असल्यामुळे कांहीं