पान:मधुमक्षिका.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३१ )



व्यवहारावरून एकाद्यास असें स्पष्ट दिसून येईल कीं, जणु काय, ह्यांचीं अंतःकरणेच अगदीं एकरूप होऊन गेली आहेत. ह्याचें कारण असें कीं, त्यांच्यांत व- हिवाटच तशी. वधुवरांचीं वयें कशींही कमजास्त असली, तरी चिंता नाहीं.प्रीति कोणत्याच स्त्रीपुरु- षांत नाहीं, असें मी ह्मणत नाहीं.एकमेकांच्या जि-वास जीव देणारी स्त्रीपुरुषे इंग्लंदांत अनेक आहेत. येथील बहुतेक स्त्रिया हुशार निष्कपट, आणि सुशील आहेत. त्यांच्या अंतःकरणांत लबाडीस व मूर्खपणास जागा मिळत नाहीं. जर उभयतांत कांहीं भांडण उ- त्पन्न झालेच, तर अपराध बहुत करून पुरुषाकडे विशे- ष असतो; असें माझे मत आहे.
 इमानाविषयीं इंग्लिश लोक बाणा बाळगितात, व प्र तिष्ठा मिरवितात, त्याप्रमाणे ते इमानी बहुतांशीं आहेत, ह्यांत संशय नाहीं. तथापि त्यांच्या वहिवाटीत अशीं कितीएक भाषणें येऊन चुकतात कीं, तीं बोलणारा अ- सत्य समजून बोलतो, व ऐकणाराही तीं खोटों मानि- तो. परंतु, ती रूढ आहे, ह्यामुळे तसल्या भाषणाचें कोणास कांहीं वाटत नाहीं. उदाहरण. अस भेटण्या- करितां ब हा त्याचे घरीं गेला; अचे मनांत त्याला भेटावयाचें नाहीं; तर, तो आपला नौकर क ह्यास सांगतों कीं, मी घरांत नाहीं असें बला सांग. त्याप्रमाणे तो सांगतों. ह्यांत क बोलला तें खोटें, असें बला पुरें ठाऊक असले, तरी तें भाषण तो दोषास्पद मानीत नाहीं. इतर देशांपेक्षां इंग्लंदांतही एक उत्कृष्ट गोष्ट विशेष आहे कीं, कितीही नीच पदवीचा मनुष्य असला,