पान:मधुमक्षिका.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३० ) बेखेरीज, दुसऱ्या पांच चार नसल्या तरी, कचभाषा चांगलें बोलण्यासारखी अलबत आलीच पाहिजे, असें . आहे. त्यांची आईबापें आपले घरीं प्रसंगोपात्त मेज- वानीचा थाट करून मोठमोठे लोकांस भोजनास बोला- वितात. त्या प्रसंगी एकाद्या श्रीमान्, विद्वान्, व रूप- वान्, पुरुषास, आपल्या विद्वत्तेनें, चातुर्यानें, सौंदर्यानें, व चालरीतीनें, वश करण्यास जी तरुण स्त्री समर्थ होते, तिची आईबापें तिजविषयों आपणांस कृतकृत्य मानितात. तथापि तिचें काम तेंवढ्यानेच होत नाहीं. कां कीं, नवरा श्रीमान् मिळण्यास तिजपाशीं द्रव्य असले पाहिजे, अथवा तेव्हां जवळ नसले तरी, तिची आईवापें वगैरे मृत झाल्यावर तरी तिला द्रव्य मिळण्याचा संभव असला पाहिजे. तरच तिला कोणी बायको करितो; एरव्हीं एशिया खंडामध्यें एकादी स्त्री अविवा- करीत नाहीं. परंतु, युरोप खं- हित राहिली, तर तिला लोक मोठी साध्वी मानितांत; आणि तिचें त्यांस फार नवल वाटतें. डांत अशा हजारों असतात. ह्मणून त्यांचें कोणास आश्चर्य वाटत नाहीं. त्या जरी लग्न करीत नाहीत, तरी त्यांचे राहणें विवाहित स्त्रियांप्रमाणे नीटनेटके अ- सतें. लग्नाची गोष्ट निघाली की, "तिजपाशी कांहीं जागा आहे काय " हा प्रत्येक अविवाहित पुरुषाचा प्रथ म प्रश्न असतो. आणि ती जर सधन असली, किंवा कांहीं कालानें सघन होण्याचा संभव असला, तर ती कुरूप असली तरी तिला वरितो. असे घडते तेव्हां, हा माझा गुण नव्हे, तर माझे द्रव्याचा आहे, असें ती पक्के जाणते. तथापि, त्यांच्या आचरणावरून व पत्र-