पान:मधुमक्षिका.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२९ ) मोहनलालाचें प्रवासवर्णन. विलायत. मोहनलालानें पुष्कळ दिवस इंग्रजांच्या विलायतेंत घालविले. तेणें करून तेथच्या लोकांची स्थितिरीति त्याला बरीच माहीत झाली. तिजविषयी त्याचा लेख आहे, तो येणेंप्रमाणे:- इंग्लंदांतील लोकांच्या रीतिभाती अत्यंत सुधारलेल्या आहेत. ज्ञानवृद्धीच्या कामीं व आपले मुलांस शाहणे करण्याचे कामीं ह्या देशांतील लोक जितका पैसा खर्चि तात, आणि जितकी काळजी बाळगितात, तितकी इतर कोणत्याही देशांतले लोक बाळगीत नसतील. मुलाला कळावयास लागले ह्मणजे, त्याला कोणत्या प्रकारचा धंदा आवडतो, व शिकावासा वाटतो, तें विचारितात; आणि ज्यांत त्याची रुाचे दिसेल व बुद्धि चालेल, तो धंदा शिकण्यास त्याला लावितात. मग तो सरकारी कामकाजाचा असो, वकिलीचा असो, शिपायाचा अ सो, अगर दुसरा कोणता असो. मुलानें मिळवून माझे पोटास घालावें, ह्याची कोणी फारशी इच्छा धरीत नाही; तर त्याची भरभर व्हावी आणि आपण पाहा- वी, इतक्याचीच ते वाट पाहात असतात. मुलींवर त्यांच्या आयांची सक्त नजर असते. त्यांच्या हाता- खालीं त्या तयार होतात. मग बायकांच्या मंड •ळींत सहजच त्या प्रतिष्ठा पावतात. ची रीत मोठ्या टापटिपिची असून प्रतिष्ठित दिसली पाहिजे. नाचणें, आणि गाणें, ह्या कला अवश्य येत असून, स्वभा• त्यांस मुलींची राहण्या- वागण्याची शैली लिहिणें, वाचणे,