पान:मधुमक्षिका.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३)

तिची साक्षात् प्रतीति आली असतां तिजविषयों शंका राहात नाहीं, हीच विद्येची परिपक्कता होय. आणखी असें आहे कीं, विद्येच्या परिपक्कतेनें मनुष्याचा स्वभाव पूर्णता पावतो. ह्याचें तात्पर्य हेच की, ज्याचा जो मू. लस्वभाव बरा किंवा वाईट असतो, त्यास त्याप्रमाणे वि. नधोक वागतां येतें; ही स्वभावाची पूर्णता जाणावी. ह्यावरून, विद्या ही खरोखर उत्तम वस्तु असतां, ती ज्यास लाभते, त्याचे हातून कधीं कधीं अत्यंत घोर कर्मे घडता- त, ह्याचें कारण ती अमोल विद्या नव्हे, तर त्याचा अं- गस्वभाव आहे, अर्से खचीत समजावें. अग्नि हा एक ह्या पृथ्वीवर अत्युपयोगी पदार्थ आहे; त्यापासून पाकनिष्पत्यादि फार सुखावह कामें होतात. त करून घ्यावयाची टाकून कोणी दुष्ट, लोकांचीं घरें दग्ध करण्याचे कामीं जर त्यास लावील, तर तेथें अनीनें काय करावें. ? तो त्याचा दोष आहे काय. ? ज्याचे सन्निध जावें, त्यास जाळावें, इतकें मात्र तो जाणतो. त्याप्रमाणें जो आपला स्वीकार करील, त्याचे मनोरथ, कसेही युक्तायुक्त असले तरी ते यथाश- क्ति पूर्ण करावे, एवढें विद्येला ठाऊक आहे; ती जास्ती कांहीं ओळखीत नाहीं. आपण बाग करतो. त्यामध्यें अनेक झाडें आपोआप उगवतात. त्यांमध्ये कितीएक चांगलीं व उपयुक्त असतात; आणि कितीएक वाईट, विषारी असतात. आपण चांगली तेवढीं ठेवून त्यांची आणखी मरामत राखितों; आणि वाईट असतात तो स गळीं समूळ खणून टाकितों. त्याप्रमाणे, मनामध्ये ज्या अनंत वासना उत्पन्न होतात, त्यांपैकी, चांगल्या असं-