पान:मधुमक्षिका.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२८ )


असतात, हें बहुधा सर्व लोकांच्या पाहाण्यांत : आहे. तर, आह्नीं असें विचारितों कीं, असें कां असावें ? तर त्यावर उत्तर हेंच कीं, त्यांची पेरणी होते तेव्हां, उभयपक्षी मनें एकमेकांवर जशीं . फिदा असावीं तशीं असतात, त्यांच्यामध्यें कांहीं पडदा राहिलेला नसतो, ह्मणून तीं मुलें चांगलीं निपजतात. आतां, मुलाचें बुद्धिबल, स्त्रीपुरुषांच्या मनांच्या मिला- फावर कां असतें. ? शेत चांगले तयार केलें आहे, पाऊस चांगला पडला आहे, आणि पेरणी करतांना जर शेतकरी रडत चालला आहे, तर तें शेत चांगलें पिकणार नाहीं कीं काय ? असें जर कोणी विचारी- ल, तर त्याविषयीं आमच्यानें तूर्त उत्तर देववत नाहीं. परंतु जे पाहाण्यांत आलें, व जें अनुमान कांहीं उदाह-- रणांनी सिद्ध झालें, तें लिहिलें आहे. तर, मुलांस व मुलींस चांगलीं मोठीं होऊं देऊन, त्यांस विद्या शिकवून, त्यांस बऱ्यावाइटाचें पक्के ज्ञान करून देऊन, नवरा ह्मणजे काय, बायको ह्मणजे काय, त्यांचीं परस्प- रांविषयीं कर्तव्यें व संबंध काय, ह्या सर्वकाही गोष्टी त्यांस समजून देऊन, त्यांच्या इच्छेप्रमाणें त्यांचे विवाह करावे, अशी देशसुधारकांनी तजवीज केली पाहिजे. - अथवा, सध्याच्या स्थितींत तूर्त आपल्या बायकांस मो- कळ्या मनानें वागवून, त्यांचे आपले मन अगदीं एक ठेवून संसारांत नांदणें हें तरी त्यांस फार आवश्यक आहे. ह्मणजे त्यापासून पूर्वी सांगितलेली अडचण कांहीं नाहीं तरी, बरीच दूर होईल अशी आशा आहे,