पान:मधुमक्षिका.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२७ )



मुळे संसाराची वाताहात होणें, गुप्तपणे उभयपक्षी व्यभिचार वाढणें, स्त्रियांकडून गर्भपातादि घोर कर्मे घडणें, इत्यादि अनर्थकारक गोष्टी लहानपणीं लग्ने केल्यापासून होतात, ह्यांचीं हजारों उदाहरणे लोकांच्या नजरेस हरहमेषा पडतात, ह्यास्तव त्याविषयीं येथें विस्तारें लिहीत नाहीं. परंतु, एक दुसरी मोठी हानि एकंदर देशाची होते, ती मनांत आणिली पाहिजे. ती हानि हीच कीं, प्रजा अप्रबुद्ध उत्पन्न होते. विचारदृष्टीने पाहाणाऱ्या मनुष्याच्या लक्षांत असें यावयाजोगे आहे कीं, आमच्या लोकांत जीं वडील ह्मणजे पहिलीं मुलें होतात, तीं आपल्या धाकट्या भावंडांपेक्षां बुद्धीने बहुधा फार कमी असतात. पुष्कळ मुलांच्या कुटुंबांत शोध करून पाहावा, ह्मणजे आह्लीं ह्मणतों ह्याची सत्यता, शेकडा ९०, किंवा निदान ७५ कुटुंबांत तरी सांपडेल. ह्याचें कारण, मला वाटतें कीं, स्त्रीपुरुषांचीं मनें गर्भसंभवकाळीं एकमेकांवर फिदा किंवा मोकळीं नसतात, हें होय. आमच्या लोकांतले पहिले मल लाजेखाजेचें, अबोल्याचें, अनोळखीचें, आणि भिडेचें असें असतें. तें तसेंच लाजाळू, मुखदुर्बल, आणि अप्रबुद्ध असें निपजतें; आणि पुढें सहवासपरत्वें जसा त्या स्त्रीपुरुषांच्या मनाचा मेळ बसत जातो, व लज्जा, भीड, ह्रीं कमी होत जातात, तसीं मुलें अधिका- धिक चपल, बुद्धिमान् आणि पसंत उत्पन्न होतात. वेश्यांचीं मुलें गरतींच्यांपेक्षां ह्मणजे इतर लोकांचे मुलांपेक्षां मोठीं चलाख, बुद्धिमान्, आणि हुशार