पान:मधुमक्षिका.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२६ )



ली पाहिजे. ही मूर्खपणाची समजूत त्यांचे मनांत भरून गेलेली पाहून मला मोठा चमत्कार वाटतो. कारण विद्येपासून मनुष्याचे हितच व्हावयाचे; अहि-त कदापि व्हावयाचें नाहीं, हें खचीत समजावें. विद्येच्या योगानें स्त्रियांचे हातून अनर्थ होण्याचा ज- सा संभव आहे, तसा पुरुषांच्या हातूनही होण्याचा संभव आहे, इतकेंच नव्हे, तर त्यांचे हातचे अनर्थ आपण अहोरात्र पाहात आहों. तर, अनर्थांच्या भयामुळे बायकांस विद्या न शिकविणें, हा अन्याय नव्हे काय ? ह्या गोष्टीचा विचार आमचे लोकांनी करावा. आपल्या स्त्रियांस, बहिणींस, मुलींस, व इतर आत बायकांस विद्या शिकवावी. ह्मणजे त्यांचे फार हित होईल.
 आणखी स्त्रियांस हलके लेखण्याची व दासींप्रमाणें वागविण्याची चाल जी आमचे लोकांत फार आहे, ती अगदीं वाईट आहे. पुरुष हा शेतकरी, स्त्री हैं शेत; अथवा पुरुष हा दोरा आणि बायको ही सूय. नुसता शेतकरी किंवा नुसता दोरा काय कामाचा? तो काय करणार ? त्यांस यथानुक्रमें शेत आणि सूर्य हीं साह्य असली, तरच त्यांचें सार्थक्य होणार नाहीं तर ते व्यर्थ, असें समजावें.
 मुलांची लग्ने लहानपणीं करण्याची वहिवाट, जी हल्लीं आपणांमध्यें फार चालू आहे, तिजपासून ह्या देशामधील लोकांचें जितके अहित झालें आहे, तितकें दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपासून झाले नसेल. मनें न मिळाल्यामुळें दादलाबायकांचे वैमनस्य पडणें, त्या-