पान:मधुमक्षिका.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२५ )


सध्या चोहींकडे विद्याविद्या झाली आहे, असे पुष्कळ लोकांच्या तोंडून मी ऐकतो, पण त्याचा अर्थ मला समजत नाहीं. पुष्कळ लोकांस लातिन, इंग्लिश, संस्कृत, इत्यादि भाषा चांगल्या येतात. व त्यांतील अत्यंत गहन ग्रंथही समजतात. आगगाडी अशी चालते, तारायंत्रानें अशी बातमी जाते, वाफेनें छाप- ण्याचे काम असें चालतें, देवी अशा काढितात, ह्या- प्रमाणे वाकूपांडित्य करणारे, कदाचित् शेंकडा साठांवर- ही निघतील. परंतु, सामान पुढे ठेवून कसें तें करून दाखवा, असें लटले असतां पुढे सरसावणारा शेकडा एक निघाला, तर हिंदुस्थानाचे प्रारब्ध उघ- डलें, असें मी मानीन. ह्यास्तव पोपटविद्या सोडून खरी विद्या संपादावी.

आणखी, प्रारब्धाची फुसकी काडी सोडून, उद्यो- गाची बळकट कांस धरावी. पक्का भरवसा ठेवावा कीं,उद्योगाने सर्व साध्य आहे.आमच्या लोकांनीं नशी बावर हवाला ठेविल्यामुळेंच त्यांस ही दशा प्राप्त झाली. आहे. नशीबाचेच बाप मुहूर्त होत त्यांविषयीं- ही लोकांचे वेडेपण गेलें पाहिजे. साखर निरंतर गोड असावयाची, ती कधीं कडू लागली आहे, असें होत नाहीं. ती गोड लागण्यास सुमुहूर्त लागत नाहीं. त्याप्रमाणें दृढनिश्चयपूर्वक चांगला उद्योग केव्हांही करा, त्यापासून सुफल प्राप्त झाल्या- वांचून राहावयाचें नाहीं, हें निःसंशय समजावें.
  स्त्रियांस विद्या शिकविली असतां अनर्थ होतील, अशी वेडी समजूत आमच्या लोकांत आहे, ती त्यांनी टाकि