पान:मधुमक्षिका.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२४ )



लें; त्यास सर्व लोकांची मान्यता मिळाली होती असें नाहीं; तेव्हां दूरवर विचार करून बहुसंमतानें कोण- तीही गोष्ट ठरविण्याचा पाठ अगदीं नव्हता; ह्यास्तव, त्यांनी लिहिलेलें सर्वकाळ सर्वांनीं शिरसावंद्य मानून राहावें, आणि त्याविषयीं स्वतः कांहीं विचार करूं नये, असें नाहीं. एकंदरीनें विचार करून पाहिलें असतां, जनाच्या सोयी, सुर्खे व संपत्ति, हीं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. आणि हीं सर्व ज्ञानवृद्धीचीं फळे होत. तेव्हां सांप्रत काळीं पूर्वीच्यापेक्षां ज्ञान अधिक वाढत चाललें आहे, असें कोणीही कबूल करील. त्याअर्थी प्राचीन काळच्या लोकांचे व्यवहार- संबंधी लेख, आलीकडच्या लोकांच्या वास्तविक हितास किती प्रतिबंधक आहेत, हें सुज्ञ पुरुषांच्या सहज लक्षांत येईल.
 आह्मी असें ह्मणत नाहीं कीं, आमच्या लोकांचें सर्वच वाईट आहे, आणि इंग्लिश लोकांसारख्या सुधा- रलेल्या लोकांचें सर्वच चांगले आहे. जशा आम-त्या यांत पुष्कळ समजुती वाईट आहेत, तशा त्यांच्यां मध्यें थोडा तरी वाईट आहेतच. ह्मणजे त्यांच्यांत आमच्यांत भेद इतकाच कीं, त्यांच्यांत चांगल्या सम- जुती पुष्कळ; आणि आमच्यांत वाईट पुष्कळ. दूर करण्यास आमचे लोकांनीं झटावें.ज्यांत धर्म- संबंध आहे, त्या तूर्त एकीकडे असोत. बाकीच्यांत तरी आधीं यथाशक्ति सुधारणा करावी. प्रथमतः अभिमान सोडावा; आणि इंग्लिश लोकांत सुखावह अशी जी अपार विद्या भरली आहे, ती संपादावी.