पान:मधुमक्षिका.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२३ )


जवळच्याजवळ लावून पाहा, ह्मणजे खातरी होईल. - हे जर विलायतेच्या बाहेर न पडते, तर ह्यांस हिंदुस्था- नाचें एवढें राज्य मिळतें काय ? व ते इतके उत्तमावस्थे- प्रत पावते काय ? ह्याप्रमाणेंच परभाषा शिकण्याचें व अनेक विद्या पढण्याचें फळ आहे. तर आमचे लोकांनीं व्यर्थ जुन्या समजुती सोडून देऊन असा विचार करावा कीं, जसें आपले घरांतून कांहीं कामा- निमित्त बाहेर पडणें, तसेंच परदेशीं जाणें; जसें वेद समजण्याकरितां संस्कृत पढणें, तसेंच अनेक विद्यांचें ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठीं इंग्लिश, लातिन वगैरे भाषा शिकणें; ह्यांत काय अधर्म आहे? किंवा ह्यांत काय पाप आहे.! ह्यांत असत्य भाषण, असत्याचरण अथवा दुसऱ्यास दु:ख देणें, ह्यांपैकीं कांहीं नाहीं. तेव्हां अश। गॊष्टी आह्नों कधींही वर्जू नयेत.

 आणखी एक गोष्ट नव्या रीति घेण्याविषयीं सांगतों. आमच्या धर्मशास्त्राकडे पाहावें तो, त्यांत निजणें, बसणें, उठणें, चालणें, बोलणें, शौचास जाणे, हात धुणे, पाय- धुर्णे, इत्यादि अगदीं यःकश्चित् बारीक गोष्टींविषयीं देखील नियम सांगितले आहेत. तेव्हां व्याज, व्यापा- राचें पदार्थ, इतर लोकांशीं दळणवळण, ह्या मोठ्या गोष्टींचा विचार त्यांत केला असेल, ह्यांत कांहीं नवल नाहीं. परंतु, ह्यांविषयीं आपण मनामध्यें असें ठेवावें कीं, ते लेख फार प्राचीन काळचे आहेत; ते सर्व लोकांचें हिताहित पाहून व सर्व कालांवर लक्ष्य देऊन केलेले नाहीत; ज्यास जे तेव्हां योग्य व सोईचें वाटलें, तें त्यानें नियमाप्रमाणे लिहून ठेवि-