पान:मधुमक्षिका.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२२ )


दिवस गेले. आतां प्रवास करण्यास आगगाडया व आगबोटी पाहिजेत तितक्या आहेत; व चोहींकडे बंदोवस्तही चांगला आहे. तेव्हां पाहिजे तिकडे प्रवास करण्यास हरकत नाहीं. जो मनुष्य आपले घरांतून बाहेर न पडण्याचा निश्चय करून चूलकोंबडा होईल, त्यास लोकांमध्ये मान प्रतिष्ठा मिळण्याचा, त्याची सुधा- रणा होण्याचा, व चवघांत बसल्या उठल्या पासून जें सुख मिळतें तें मिळण्याचा संभव फार कमी आहे. त्याप्र- माणें जे लोक आपणांस आपल्या देशामध्ये कोंडून घेता- त, कधीं बाहेर पडत नाहींत, ते सर्वदा रानटी, अज्ञानी, आणि दुःखी राहतील; हें पक्के समजावें. ह्याच्या उलट उदाहरण पहा. जे लोक हल्लीं सुधारणेच्या कळसास पोहोंचले आहेत, त्यांचें गमन कोणत्याही देशांत नाहीं असें नाहीं. ते सर्व देशांत जातात; तेथें कायकाय उत्पन्न होतें तें पाहतात; त्यांतून आपणांस उपयोगी परंतु दुर्मिळ असें असेल, तें स्वदेशीं आणितात; तेथल्या लोकांच्या रीतिभातींचा विचार करून, . त्यांपैकी ग्राह्य असें जें आढळेल तें तत्काळ घेतात; आपल्या देशांत- ले विपुल पदार्थ, जे तेथें मिळत नसतील परंतु आव- श्यक असतील, ते तेथें नेऊन विकून खूब पैसा मिळ- वितात; असा व्यापार करतांकरतां तेथें आपलें चांगलें. वजन पाडून, ते तेथच्या लोकांच्या व राजांच्या कल- हांत हात घालितात; आणि "दोघांचें भांडण आणि तिसऱ्याचा लाभ” ह्या ह्मणीप्रमाणे, अपार संपत्तीच केवळ नव्हे, तर मोठें राज्य देखील संपादितात. ' हैं आह्नों जें आतां सांगितलें, तें सर्व इंग्लिश लोकांस