पान:मधुमक्षिका.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२१ ).



भिमान ह्मणून जो एक अमूल्य गुण मनुष्याचेठायीं असतो, तो तिच्यायोगे आमच्या लोकांच्या अंतःकर- - णांतून अगदीं नाहींसा झाला आहे. ही अत्यंत दुःखा- ची गोष्ट होय. स्वदेशाभिमान हा उत्तम खरा; परंतु तो मी एकटाच धरून बसल्यानें काय होणार आहे; माझे सारखे त्याचे अवधारणकर्ते आणखी निदान शेप- नास तरी पाहिजेत; तेव्हां त्याचा कांहीं चांगला परिणाम होईल, असे प्रत्येक मनुष्याच्या मनांत येऊन त्याची उमेद खचण्याचा बराच संभव आहे. परंतु, बाजरीचें एक एक कणीस पाहिलें असतां फार तर पसा पसा धान्याचें असतें. अशा पसापसा धान्याची जमवाजमव करून काय होणार, असें जर कोणी ह्मणेल, तर तें शोभेल काय ? पसापसा करूनच खंडी होते. तसे, एक एक करतां करतांच 'हजारों स्वदेशाभिमानी होतील, आणि त्यां- पासून चांगलें फळ होईल. असो. आतां सध्याच्या स्थितींतच हिंदुस्थानाची सुधारणा होण्यास कोण- कोणत्या गोष्टी उण्या आहेत, ह्याचा थोडासा विचार करूं.

 आमचे लोकांनी पहिली गोष्ट ही केली पाहिजे कीं, त्यांचे मनांत पूर्वापार संप्रदायावरून जीं विलक्षण वेडें भरलीं आहेत, तीं टाकून द्यावीं.. स्वदेशमर्यादेचे बाहेर जाणें हें पाप आहे, हें मानणें बरोबर नाहीं. ह्यास जरी एकाद्या ऋषि- वचनाचा आधार असला, तरी तें वचन ज्या काळीं ज्या ऋषीनें लिहिलें, त्या काळी त्यास, लोकांच्या दुर्बल- व अज्ञान स्थितीस योग्य वाटले असेल. परंतु,

११